
नमस्कार मित्रांनो, आमच्या आज च्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्या साठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आज आपण सातबारा उताऱ्यात कोणता बदल झाला आहे, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आपण ज्या प्रॉपर्टी वरती हक्क बजावत असतो, त्या प्रॉपर्टीचा किंवा जमिनीचा मालकी हक्क दर्शवणारा कोणता महत्त्वाचा कागद असेल तर तो म्हणजे सातबारा उतारा. सातबारा उतारा हा एक प्रकारे आपल्या जमिनीचा आरसा असतो. कारण या सातबारा उताराच्या माध्यमातून ती जमीन कोणाच्या नावावर आहे, किती क्षेत्र जमीन आहे वगैरे सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती या सातबारा उताऱ्यात आपल्याला मिळते. त्यामुळे जमीन असणाऱ्या प्रत्येक शेत मालकाकडे किंवा व्यक्तीकडे सातबारा हा असतोच.
त्यामुळे च शेतकरी आणि सातबारा यांचा अगदी घनिष्ट संबंध आहे. या सातबारा उताऱ्यात महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी काही न बदल होत गेले आहेत. आताही महाराष्ट्र शासनाने नुकतेच सातबारा उताऱ्यावर काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत, आणि हे बदल काय आहेत ते प्रत्येक व्यक्तीला व शेतकऱ्याला माहीत असणे आवश्यक आहे. त्यासाठी च आम्ही आजचा हा लेख आणला आहे. या लेखात आम्ही तुम्हाला सातबारा उताऱ्यात कोणते महत्वपुर्ण बदल झाले आहेत या बद्दल माहिती सांगणार आहोत त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
सातबारा उताऱ्यात नेमका काय बदल झाला आहे
मित्रांनो, जस जसे इंटरनेट मध्ये प्रगती होत गेली तसं तसे प्रत्येक दैनदिन काम करण्याची पद्धत देखील बदलत गेली. यातच आपला हस्तलिखित सातबारा ऑनलाईन मिळू लागला आणि शेती संबधित कामे सोपी आणि वेगाने होऊ लागली. आता याच सातबारा मध्ये आणखी एक बदल झाला आहे आणि तो म्हणजे सातबारा उताऱ्यात यापुढे अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक म्हणजेच युएल पिन ULPIN नंबर देण्यात येणार आहे. UL PIN म्हणजे ज्याला इंग्रजी मध्ये युनिक लँड पार्सेल आयडेंटीफिकेशन नंबर असे म्हणतात.

आणि आता राज्यातील सर्व सातबारा उताऱ्यावर यापुढे अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक म्हणजेच युएल पिन नंबर (UL PIN) दिसणार आहे. मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि या UL PIN मुळे नेमके काय होणार आहे?. सातबारा उतारा किंवा मिळकत पत्रिकावर जो UL PIN दर्शविला जाणार आहे त्यामुळे सरकारला कोणाच्याही व कोणत्याही मालमत्तेचा शोध घेणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहे. म्हणजेच सातबारा उताऱ्यावर UL PIN येणार असल्याने देशातील कोणत्याही मालमत्ता दस्तावर स्वतंत्र क्रमांक दर्शविला जाईल व त्या दस्ताऐवजाची ओळख तात्काळ पटवणे शक्य होणार आहे.
आता या UL PIN मुळे सातबारा उताऱ्यावर कोणते बदल होणार ते जाणून घेऊ या:-
- मित्रांनो, सातबारा उताऱ्यावर आता गट क्रमांक व उपविभाग च्या उल्लेखाआधी आता पिन क्रमांक टाकला जाईल.
- तसेच सातबारा उताऱ्यावर यूएल पीन संबंधीचा स्कॅन केला जाणारा एक क्यूआर कोड दिसेल. हा कोड सातबाऱ्याच्या उजव्या कोपऱ्यात असेल आणि या ठिकाणी एक क्रमांक देखील दिलेला दिसेल.
- सातबारा उताऱ्यावर किंवा मिळकत पत्रिकेच्या मध्यभागी महाराष्ट्र शासनाचे बोधचिन्ह असेल.
- सातबारा उताऱ्या वर वरती डाव्या बाजूला अकरा अंकी यू एल पिन क्रमांक दिला जाईल.
- मित्रांनो, नागरिकांना जसा आधार क्रमांक दिला जातो आणि त्याद्वारे संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळते अगदी अशाच पद्धतीने हा यु एल पिन काम करणार आहे.
मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर युएल पिन म्हणजे मालमत्तेचा आधार क्रमांकच आहे. युएल पिनमुळे तुमचा सातबारा व त्याची संपूर्ण माहिती अगदी एका क्लिक वर मिळण्यास मदत होणार आहे.
तर मित्रांनो, आज आपण सतराव्या श्लोकातील म्हणजेच UL PIN मधील महत्त्वाच्या बदलाबद्दल जाणून घेतले. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडेल आणि या लेखात दिलेली माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच जर तुम्हाला हा लेख महत्वाचा वाटत असेल