नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑनलाईन पद्धतीने फ्री मध्ये सातबारा कसा बघायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या उताऱ्यावर कोणाकडे किती जमीन आहे, कोणाच्या मालकीची आहे याची माहिती दिलेली असते. त्यामुळे हा सातबारा उतारा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यासाठी, किंवा काही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी खूप आवश्यक मानला जातो.
थोडक्यात सांगायचे झाले तर, सातबारा उतारा हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याद्वारे राखला जातो आणि त्या मध्ये एका विशिष्ट भूखंडाचे संपूर्ण तपशील दिले जातात. हा सातबारा उतारा तुम्हाला बघायचा असल्यास तो तुम्ही महाभुलेख किंवा महाराष्ट्र भूमी अभिलेख च्या वेबसाइट वरून ऑनलाईन बघू शकता. मित्रांनो, हा सातबारा उतारा तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईल वरून फ्री मध्ये पाहू शकता फक्त कोणत्याही शासकीय बाबींसाठी तुम्ही हा उतारा वापरू शकत नाही. हा सातबारा उतारा ऑनलाइन कसा बघायचा ते जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
ऑनलाईन सातबारा (7/12) कसा बघायचा ?
स्टेप 1 : मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला महाभूमिलेख च्या ऑफिशियल वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in या वर जायचे आहे.
स्टेप 2 : वेबसाईट ओपन झाल्यावर तुमच्या समोर एक नवीन टॅब ओपन होईल. त्यात तुम्हाला जमिनी बद्दल तपशील बघायचे असतील तर त्यासाठी उजव्या बाजूला स्कॉल करून दिलेली माहिती टाकायची आहे. ज्यात तुम्हाला तुमचा विभाग टाकयचा आहे व नंतर Go ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
प्रमुख विभाग – अमरावती, औरंगाबाद, कोंकण, नागपूर, नाशिक, पुणे. तुम्ही तुमच्या जवळचा प्रमुख विभाग निवडा.
स्टेप 3 : आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमच्या विभागाचे नाव आलेले दिसेल. व त्या खाली 7/12, 8 अ असे दोन ऑप्शन दिसतील. त्यात 7/12 ऑप्शन वर क्लिक करून जिल्हा व नंतर तालुका निवडायचा आहे. व त्यानंतर तुमची शेती किंवा जमीन ज्या गावात आहे ते गाव निवडा.
स्टेप 4 : आता त्या नंतर तुम्हाला सर्वे नंबर टाकायचा आहे. (सर्वे नंबर माहीत नसेल तर तुम्ही तुमचे पहिले नाव, आडनाव टाकू शकता.) व नंतर ‘शोधा’ या बटन वर क्लिक करायचे आहे.
समजा तुम्ही आडनाव टाकून बटन क्लिक केले असेल तर खाली तुम्हाला तुमच्या गावातील त्याच आडनाव च्या लोकांची यादी दिसेल. तुम्ही त्यातील तुमचे नाव शोधून क्लिक करा
स्टेप 5 : या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व ‘७/१२ पहा’ या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 6 : त्यानंतर पुढे तुम्हाला दिलेला कॅपचा टाकायचा आहे. व Verify ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 7 : मित्रांनो, आता पुढच्या पेज वर तुम्हाला सातबारा चा उतारा आलेला दिसेल. या उताऱ्यावर तुम्हाला ती शेतजमीन कोणाची आहे, किती क्षेत्र आहे, सर्वे नंबर, जमिनीचा किती आकार आहे वगैरे सर्व माहिती दिसेल.
महत्वाची गोष्ट: हा सातबारा तुम्ही कोणत्याही शासकीय बाबींसाठी वापरू शकत नाही. शासकीय कामासाठी डिजिटल सातबारा लागतो.