मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी व मुलींसाठी सरकार वेळोवेळी नवं नवीन योजना राबवित असते. त्यातच नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत. त्यात सर्वात महत्वाची योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’.
ही योजना महिला व बालकल्याण विभाग यांच्या अंतर्गत राबवली जाणार असून महाराष्ट्रातील महिलांना आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्म निर्भर बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारने म्हटलं आहे. या योजनेच्या माध्यमातून आता महिलांना दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत म्हणून देण्याचे या अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे या योजने नुसार आता महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत.
तर मित्रांनो, काय आहे नेमकी ही योजना, त्यासाठी अर्ज कुठे करायचा, त्यासाठी पात्रता काय आहे, कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत, या अश्या सर्व गोष्टीं बद्दल आज आपण या लेखातून माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा….
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज भरण्याची ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे. अर्जदार महिलेने स्वतः अर्ज करण्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून महिलेचा फोटो काढता येईल आणि ई केवायसी ची प्रक्रिया करता येईल. तसेच महिलेने कुटुंबाचे ओळखपत्र किंवा शिधा पत्रिका म्हणजेच रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मोबाईल ऍप द्वारे अर्ज कसा करायचा ?
मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने साठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज तुम्ही राज्य सरकारच्या ‘नारीशक्ती दूत’ ( Narishakti doot ) या मोबाईल ऍप द्वारे करू शकता. या ऍप द्वारे अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी पुढीक स्टेप्स फॉलो करा….
स्टेप 1 : मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरुन राज्य सरकारने तयार केलेले Narishakti Doot (नारीशक्ती दूत) नावाचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचं आहे आणि ते इन्स्टॉल करायचं आहे.
स्टेप 2 : त्या नंतर ज्या महिलेचा फॉर्म भरायचा आहे, तिचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली दिलेल्या टर्म्स आणि कंडिशन्स ऍक्सेप्ट करायच्या आहेत. आणि मग लॉग इन या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 3 : त्या नंतर तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी दिलेल्या जागी टाकून व्हेरिफाय ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 4 : त्या नंतर तुम्हाला काही परमिशन्स विचारल्या जातील त्यांना allow करायचं आहे.
मित्रांनो, या नंतर अर्जदार महिलेची प्रोफाइल पूर्ण करायची आहे. त्यासाठी दिलेल्या ‘ आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा’ या निळ्या रंगाच्या अक्षरावर क्लीक करायचे आहे.
स्टेप 5 : त्या नंतर अर्जदार महिलेचं किंवा मुलीचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्या नंतर महिलेचा ई- मेल आयडी असेल तर तो टाकायचा आहे.
त्यानंतर जिल्हा व तालुका टाकायचं आहे आणि नारी शक्तीचा प्रकार को ता आहे तो सिलेक्ट करून टाकायचं आहे. मित्रांनो, नारीशक्ती चा प्रकार म्हणजे अर्जदार महिला सामान्य महिला आहे की, बचतगट अध्यक्ष आहे, की अंगणवाडी सेविका आहे ते निवडायचा आहे. इथे आपण सामान्य महिला हा ऑप्शन निवडणार आहोत.
आणि त्या नंतर अपडेट करा या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 6 : त्यानंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला खाली चार ऑप्शन दिसतील, त्यातील पहिल्या ऑप्शन वर म्हणजेच नारीशक्ती दूत या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 7 : त्या नंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्या नंतर विचारलेल्या परमिशन्स allow करायच्या आहेत. आता तुमच्या समोर योजनेचा फॉर्म म्हणजेच अर्ज ओपन होईल.
स्टेप 8 : या अर्जात तुम्हाला काही माहिती भरायची आहे. जसे की सुरुवातीला अर्जदार महिलेचं किंवा मुलीचं आधार कार्ड नुसार संपूर्ण नाव टाकायचं आहे. त्या नंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव टाकायचं आहे. मग अर्जदार महिलेची जन्म दिनांक व जन्म ठिकाणाचे नाव, जिल्हा, तालुका, गाव टाकायचे आहे. त्या नंतर तुमची ग्रामपंचायत कोणती आहे ते टाकायचे आहे व नंतर पिनकोड टाकायचं आहे. आता खाली अर्जदार महिलेचा पूर्ण पत्ता, त्या नंतर मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे.
स्टेप 9 : या नंतर तुम्हाला ‘शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनांचा लाभ घेता का?’ म्हणजे कोणी पीएम किसान योजना, पेन्शन योजना, वगैरे योजनांचा लाभ घेता का, असा प्रश्न विचारला जाईल. त्याच उत्तर होय किंवा नाही, असं द्यायचं आहे. मित्रांनो, इथे जर तुमचं उत्तर होय असेल तर लाभाची रक्कम तुम्हाला तिथे नमूद करायची आहे. आणि जर तुम्ही कोणत्याही योजनांचा लाभ घेत नसाल तर ‘नाही’, असे उत्तर द्यायचं आहे.
स्टेप 10 : आता पुढे लाभार्थी महिलेची वैवाहिक स्थिती टाकायची आहे. म्हणजे अर्जदार महिला अविवाहित आहे की, विवाहित, विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित आहे, यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे.
स्टेप 11 : त्या नंतर खाली अर्जदार महिलेच्या बँक खात्याचा तपशील टाकायचा आहे. यात अर्जदार महिलेचे बँकेचे पूर्ण नाव, खाते धारकाचं नाव, खाते क्रमांक आणि IFSC कोड टाकायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला (लिंक केलेला) आहे का, असा प्रश्न तिथे विचारला जाईल. तर तिथे हो किंवा नाही असे टाकायचे आहे. शक्यतो आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असावा. आणि जर आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर तो लिंक करुन घ्यायचा आहे.
स्टेप 12 : त्या नंतर आता काही कागदपत्रे अपलोड करायची आहेत. त्यात
- महिलेचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे.
- त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र मध्ये तुम्ही 15 वर्षां पूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी एक कोणतेही कागदपत्रं देऊ शकता.
- त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र द्यायचं आहे. म्हणजे इथे अर्जदाराचे स्वयंघोषणा पत्र, त्याचा नमुना खालील दिलेला आहे. त्यावर सही व दिनांक टाकून हमीपत्र द्यायचं आहे.
- त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र द्यायचं आहे. मित्रांनो इथे अडीच लाखापर्यंतचा उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड अपलोड करू शकता.
- त्यानंतर बँक पासबुक चा फोटो अपलोड करायचा आहे.
आणि शेवटी अर्जदार महिलेचा लाइव्ह फोटो काढायचा आहे. आणि मग माहिती जतन करा, या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 13 : आता या नंतर तुम्ही भरलेली सगळी माहिती तुम्हाला दाखवली जाईल. ती भरलेली माहिती वाचून फॉर्म सबमिट करा या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 14 : त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल, तो ओटीपी टाकायचा आहे व नंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल.
स्टेप 15 : मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या फॉर्म ची स्थिती पहायची असेल तर तर मागे येऊन ‘केलेले अर्ज’ या ऑप्शन वर करायचे आहे. त्या नंतर या पेजवर तुमचा अर्ज, त्याची स्थिती दाखवली जाईल. तिथं सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच अर्जाचा क्रमांक दिला जाईल. तसेच फॉर्म पेंडिंग आहे की ऍक्सेप्ट आहे ते दाखवले जाईल. काही दिवसांनी तुमचा अर्ज व कागदपत्रे ऍक्सेप्ट झाले की तुम्हाला ‘माझी लाडकी बहीण योजनेचा’ पहिला हफ्ता दिला जाईल.
माझी लाडकी बहीण या योजनेसाठी कोण पात्र असणार ?
मित्रांनो, या योजनेसाठी संबंधित महिला महाराष्ट्राची रहिवासी असायला हवी. तसेच या योजनेसाठी विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला अर्ज करू शकता. या योजनेसाठी महिलेचे वय फक्त 21 ते 65 वर्षे पर्यंतच असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी कोण कोणती कागदपत्रे लागणार ?
मित्रांनो, या योजनेसाठी लाभार्थी महिलेचे आधारकार्ड, रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, फोटो इत्यादी कागदपत्रे लागतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बद्दल थोडी माहिती
सर्वात पहिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने बद्दल थोडी माहिती जाणून घेऊ या:
मित्रांनो, राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजने अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. ही योजना 1 जुलै पासून सुरू करण्यात आली आहे.
योजनेत झालेले बदल
- मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही फक्त महिलांसाठी असून यात आता वयाची अट शिथिल करण्यात आली असून ती 21 वयापासून ते 65 वयापर्यंत केली गेली आहे.
- तसेच आधी योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै, 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात आली असून आता सदर मुदत 2 महिने वाढवण्यात आली आहे. त्यानुसार आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
- तसेच ज्या लाभार्थ्यांनी जुलै किंवा ऑगस्ट च्या शेवटी अर्ज केले आहेत, त्यांचे अर्ज स्वीकारल्या नंतर त्यांना दोन्ही महिन्याचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे.
- यासोबतच पाच एकर जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे. शिवाय जमिनीच्या मालकीची अट देखील काढण्यात आली आहे.
- मित्रांनो, सुरुवातीला कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असेल तरच या योजनेचा लाभ घेता येणार होता. मात्र, आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार जर तुमच्याकडे हा दाखल नसेल तर आणि ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड उपलब्ध आहे, त्यांना उत्पन्नाच्या दाखला या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे.
- तसेच सुरुवातीला महिलेचे अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तरीही चालणार आहे. त्या ऐवजी महिलेकडे 15 वर्षा पूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चार गोष्टी पैकी कोणतेही एक कागदपत्रं असल्यास ते ग्राह्य धरले जाणार आहे.
- यासोबतच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मा दाखला किंवा शाळा सोडल्याचा आवश्यक आहे.
- तसेच या योजनेचा लाभ कुटुंबातील कोणत्याही दोन महिलांनाच घेता येणार आहे.