पिठाची गिरणी योजना: राज्यातील महिलांना स्वतःचा एखादा घरगुती लघुउद्योग सुरु करता यावा या उद्देशाने महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरु करण्यात आलेली एक योजना आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश महिला सुशिक्षित आहेत परंतु त्यांना ग्रामीण भागात कुठल्याच प्रकारचे रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याकारणामुळे बेरोजगार आहेत त्यामुळे महिला एखादा घरगुती उद्योग सुरु करण्यासाठी उत्सुक असतात परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्या कारणामुळे त्यांना स्वतःचा एखादा उद्योग सुरु करता येत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना घरगुती एखादा उद्योग सुरु करता यावा व थोडेफार पैसे कमावता यावेत जेणेकरून ते स्वतःच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पुऱ्या करू शकतील या उद्देशाने Mofat Pith Girni Yojana सुरु करण्याचा एक महत्वाचा असा निर्णय घेतला.
या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांना पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी 100 टक्के अनुदान देण्यात येते त्यामुळे महिलांना स्वतःजवळील रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.
योजनेचे नाव | मोफत पिठाची गिरणी योजना |
उद्देश | महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे. |
लाभ | 100 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते. |
लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिला |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
पिठाची गिरणी योजना 2024 चे उद्दिष्ट
- महिलांना ग्रामीण भागात घरीच एखादा उद्योग सुरु करता यावा व थोडेफार पैसे कमावता यावेत जेणेकरून त्या आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरज पुऱ्या करू शकतील यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- महिलांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे.
योजनेचे वैशिष्ट्य
- या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला स्वतःजवळील काहीच रक्कम भरावी लागत नाही.
- पीठ गिरणी योजना विशेष करून ग्रामीण भागात राहण्याऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे.
योजने अंतर्गत दिले जाणारे आर्थिक अनुदान
- पिठाची गिरणी योजनेअंतर्गत लाभार्थ्यास पीठ गिरणीच्या एकूण किमतीच्या 100 टक्के अनुदान दिले जाते.
योजने अंतर्गत होणारा फायदा
- पिठाची गिरणी योजना अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना घरगुती रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
- या योजनेअंतर्गत नवीन पिठाची गिरणी विकत घेण्यासाठी राज्य शासनाकडून 100 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
- महिलांना घरातच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांना नोकरीसाठी घरापासून दूर जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
- राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारी संपेल.
- राज्यातील महिला स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर बनतील.
योजनेचे नियम व अटी
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना पिठाची गिरणी योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- फक्त आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणी सदस्य शासकीय कार्यालयात नोकरी करत असता कामा नये.
- अर्जदार महिलेने केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत पीठ गिरणीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- एकाच कुटुंबातील अनेक मुली/महिला जरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्या तरी त्यातील एकाच मुली/महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल.
- योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 18 वर्ष ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारांपेक्षा जास्त असता कामा नये.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- कुटुंबाचा उत्पनाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजारांच्या आत असणे आवश्यक)
- अनुसूचित जाती/जमाती चा जातीचा दाखला
- बँक खात्याचा तपशील (अर्जदार यांचे बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी अर्जदार याचे बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स (यावर अर्जदाराचे नाव,बँकेचे नाव,शाखा,खाते क्रमांक व IFSC कोड नमूद असावा.) व हे बँक खाते सुरु असल्याबाबत मागील तीन महिने खात्यात व्यवहार झालेल्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी.)
- व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत नमुना नंबर 8 अ चा घराचा उतारा जोडावा.
- विद्युत पुरवठा सोय असलेबाबत एम.एस.ई.बी. च्या नजीकच्या बिलाची झेरॉक्स प्रत.
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- प्रतिज्ञा पत्र
अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे
- अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार महिलेने केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणीचा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदाराने एकाच वेळी 2 वेळा अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द केला जाईल.
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयातून किंवा जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल.
- अशा प्रकारे तुमची मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
मोफत पिठाची गिरणी योजना अर्ज | Click Here |