माझी लाडकी बहीण योजना अर्ज पडताळणी नुसार बाद अर्जाची यादी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बाद अर्ज: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलैपासूनच २०२४ पासून महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु झाली. आतापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेसाठी जवळपास २ कोटी ५० लाख हून अधिक अर्जदारांनी अर्ज भरलेले आहेत सर्व अर्जदारांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेले आहेत.

ज्या लाभार्त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले अशा महिलांना जुलैपासूनच लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळायला सुरु झाले आहे. जर ते हप्ते मिळाले नसतील किंवा डिसेंबर अथवा जानेवारी चा १,५०० रुपयांचा हप्ता मिळाला नसेल तर या पोस्ट च्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन अर्ज पडताळणी आपला अर्ज बाद झाला आहे का नाही व त्याची यादी कशी डाउनलोड करायची आणि त्यात आपले नाव कसे चेक करायचे, याबाद्दल जाणून घेणार आहोत.

लाडकी बहीण योजना अर्ज पडताळणी का केली जात आहे ?

माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून एकूण २ कोटी ६३ लाख अर्ज आले होते. त्यातील २ कोटी ४७ लाख अर्ज पात्र ठरले. ज्यांचे बँक खाते आधार कार्ड बरोबर लिंक आहे अशा २ कोटी ३४ लाख महिलांना योजनेचा लाभ मिळाला. लाडकी बहीण योजनेवर सरकारचे वर्षाला ४६ हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्च होणार आहे. त्याचा परिणाम इतर योजना व पायाभूत सुविधांवर होणार आहे. त्यामुळे जे निकषात न बसूनसुद्धा लाभ मिळवत आहेत त्यांचा लाभ बंद करण्यासाठी योजनेतील लाभार्थींच्या अर्जांची पडताळणी केली जात आहे.

अर्ज पडताळणीत कोणत्या महिलांना लाभ मिळणे बंद होईल ?

ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे, तरी योजनेचा फायदा घेत आहेत अशा अर्जाची छाननी केली जात आहे.

  • ज्या महिला या योजनेचा लाभ घेतात. पण त्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे.
  • एकाच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत.
  • आधार कार्डवर आणि इतर कागदपत्रांवरील नावामध्ये तफावत असलेल्या अर्जाची शासनाकडून पडताळणी करण्यात येणार आहे.
  • लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जाचीही पडताळणी होणार आहे.
  • या योजनेचा लाभ घेणारी महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसावी.

तुमचे नाव योजनेतून बाद झाले आहे का ते कसे तपासावे ?

सध्या सरकारने पडताळणीतील बाद झालेले अर्ज किंवा इतर कोणत्याही कारणाने बाद झालेले अर्ज तपासण्यासाठी लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटस चेक करण्याचा पर्याय ठेवला आहे.
त्यामुळे तुम्हाला जर तुमचा अर्ज बाद झाला आहे का? १,५०० हप्ता जमा झाला आहे का नाही हे चेक करण्यासाठी स्टेटस चेक करावे लागेल त्यासाठी खालील लिंक वरून माहिती मिळवा: