भूमी अभिलेख नवीन वेबसाईट : सर्व सेवा ऑनलाईन – सातबारा उतारा, 8अ, मालमत्ता पत्रक, क-प्रत, जमीन मोजणी | Land Records 7/12, 8A, Property Card, K Patrak, eMojani

मित्रांनो, भूमि अभिलेख सातबारा उतारा, 8अ, मालमत्ता पत्रक, क- पत्रक, जमीन मोजणी अशा सर्व सेवा ऑनलाईन डाउनलोड आणि पाहण्यासाठी नवीन वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. या बद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या मालकीच्या जमिनी बद्दल कोणतीही माहिती जाणून घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जावं लागतं. यामध्ये आपला खूप वेळ वाया जातो. म्हणून महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेख विभागाची नवीन वेबसाईट सुरू केली आहे. जेणेकरुन नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधीत सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने एकाच ठिकाणी पाहता येतील. यामध्ये सातबारा उतारा, 8 अ उतारा, मालमत्ता पत्रक, क- पत्रक, जमीन मोजणी यांसारख्या अजून ही बऱ्याच ऑनलाईन सेवांबद्दल या वेबसाईट वर पाहता येईल.

मित्रांनो, ऑनलाईन मिळणाऱ्या या पैकी काही सेवा या कोणतेही शुल्क न भरता म्हणजेच फ्री मध्ये पाहता येतील. तर काही ऑनलाईन सेवा या शुल्क भरून म्हणजेच Paid करून पाहता येतील. फक्त फ्री मध्ये भेटलेले दाखले तुम्हाला शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही, तर या वेबसाईट वरून तुम्ही फक्त आपल्या मालकीच्या जमिनी बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. चला तर मग या नवीन वेबसाईट बद्दल व त्या अंतर्गत कोण कोणत्या सेवा मिळणार आहेत, या बद्दल माहिती जाणून घेऊ या.

नवीन वेबसाईट वरील फ्री सेवा /दाखले

मित्रांनो, पहिली वेबसाईट आहे https://bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाईट वरून मिळणाऱ्या या सर्व सेवा फ्री मध्ये तुम्हाला पाहता येतील. या वेबसाईट मध्ये तुम्ही गाव नमुना नंबर ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक व क-प्रत इत्यादी सेवा पाहू शकता. या सेवांबद्दल माहिती कशी पहायची ते जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा :

स्टेप 1 :- मित्रांनो, वेबसाईट वर आल्यावर पहिल्या पद्धतीत तुम्हाला तुमचा 11 अंकी प्रॉपर्टी यूआयडी क्रमांक बद्दल विचारले जाईल.

मित्रांनो, 11 अंकी प्रॉपर्टी युआयडी क्रमांक हा एक ओळखपत्र क्रमांक आहे जो प्रत्येक प्रॉपर्टी साठी दिला जातो. हा क्रमांक प्रॉपर्टी ची नोंदणी आणि व्यवस्थापनासाठी करण्यासाठी तसेच मालमत्तेच्या मालकीच्या व स्थावर मालमत्तेच्या नोंदी सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

तुम्हाला जर त्या क्रमांक बद्दल माहीत असेल तर ‘होय’ वर टिक करून तुमचा Property UID Number टाईप करून तुमचा मोबाईल नंबर टाका व कॅपचा भरून तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी बद्दलची सर्व माहिती पाहू शकता.
पण जर तुम्हाला युआयडी क्रमांक माहीत नसेल तर ‘नाही’ ऑप्शन वर टिक करून ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक व क- प्रत अश्या एकूण चार प्रकारच्या माहिती बद्दल तुम्ही पाहू शकता.

स्टेप 2 :- मित्रांनो, 7/12 उतारा पाहण्यासाठी त्या ऑप्शन ला सिलेक्ट करायचं आहे. त्या नंतर खाली तुमचा जिल्हा, तालुका, गाव निवडायचं आहे. तुमचा सातबारा उतारा पाहण्यासाठी या वेबसाईट वर तुम्हाला सर्वे नंबर/ गट नंबर व नाव (Name) असे पर्याय दिसतील.

यापैकी तुम्हाला जर जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर माहित नसेल तर तुम्ही नाव(Name) हा ऑप्शन सिलेक्ट करु शकता.

स्टेप 3 :- तुमचं नाव किंवा गट नंबर टाकून ‘शोधा’ बटन वर क्लिक करायचं आहे. त्या नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व भाषा निवडून दिलेला कॅपचा टाकून सबमिट केलतावर तुम्हाला तुमचा सातबारा उतारा पहायला मिळेल.

स्टेप 4 :- याच पद्धतीने तुम्ही 8 अ पाहू शकता. तसेच तुम्हाला जर सिटी सर्वे नंबर माहीत असेल तर तुमचं मालमत्ता पत्रक व तसेच क- प्रत देखील तुम्ही इथे पाहू शकता.

नवीन वेबसाईट वरील डिजिटल दाखले (विकत)

मित्रांनो, https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ ही वेबसाईट आहे. म्हणजेच या वेबसाईट वरील सेवा पाहण्यासाठी तुम्हाला शुल्क द्यावं लागेल. या वेबसाईट तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीत असलेला दाखले मिळतील हे दाखले सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी तुम्ही वापरू शकता.

  • ७/१२ उतारा डाउनलोड
  • ८ अ उतारा डाउनलोड
  • फेरफार प्रत डाऊनलोड
  • मालमत्ता पत्रक उतारा डाउनलोड
  • ७/१२ फेरफारासाठी अर्ज ई- हक्क
  • मिळकत पत्रिका फेरफार अर्ज
  • फेरफार स्थिती/ अधिकार क्षेत्र
  • प्रलंबीत दिवाणी न्यायालयीन प्रकरणे
  • अभिलेख पडताळणी
  • ई-रेकॉर्डस्
  • ई-नकाशा / भू नकाशा
  • ई-मोजणी
  • ई-क्यू जे कोर्ट
  • ई- पीक पाहणी
  • आपली चावडी
  • ई-चावडी – जमीन महसूल भरणा

अश्या अनेक ऑनलाईन सेवा थोडे पैसे भरून पाहता येतील. जसे की ७/१२ उतारा डाउनलोड या ऑप्शन वर क्लिक केल्याबर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून तुम्ही तुमचा सातबारा डाउनलोड करून घेऊ शकता. फक्त यासाठी तुम्हाला 15 रुपये फी भरावी लागेल. याच प्रमाणे तुम्ही 8 अ, फेरफार यासाठी 15 रुपये ,मालमत्ता पत्रक साठी 45 रुपये वगैरे… अशी फी त्या त्या सेवेसाठी paid करावी लागेल. या सर्व प्रकारच्या सेवा तुम्ही या वेबसाईट वरून पाहू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण भूमि अभिलेख सातबारा उतारा, 8अ, मालमत्ता पत्रक, क-प्रत, जमीन मोजणी अशा सर्व ऑनलाईन सेवा पाहण्यासाठी सुरू झालेल्या नवीन वेबसाईट बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.