Solar Pump List : केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रीकरणातून शेतकर्यांना व्यवस्थित वीज पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी कुसुम सौर पंप योजना (PM-KUSUM) सुरू करण्यात आली. या योजनेसोबत शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषीपंप योजनासुद्धा नुकतीच शासनाकडून सुरू करण्यात आली.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचा वीज खर्च कमी करणे, डिझेल पंपाचा वापर कमीत कमी करणे – याउलट अपारंपारिक ऊर्जेला प्राधान्य देणे. शेतकर्यांची सोलर पंप मंजूर यादी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांना सोलर पंप वाटप करण्यात आले आहे, अशा शेतकऱ्यांची यादी ऑनलाईन उपलब्ध झाली आहे.
सोलर पंप योजना लाभार्थी यादी
सोलर पंप योजनेची यादी ऑनलाईन अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जर तुम्हाला जिल्हानिहाय सोलर पंप लाभार्थी यादी पाहिजे असेल, तर तुम्ही खालीलप्रमाणे यादी डाऊनलोड करून पाहू शकता.
- सर्वप्रथम केंद्र सरकारच्या पीएम कुसुम नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय पोर्टलला भेट द्या.
- पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय पोर्टल उघडल्यानंतर तुमच राज्य (State) निवडा.
- त्यामध्ये तुम्हाला MAHARASHTRA – MEDA व MAHARASHTRA – MSEDCL असे दोन पर्याय दिसतील. यापैकी तुम्ही कोणत्याप्रकारे अर्ज केला आहे, तो पर्याय निवडायचा आहे.
- पुढे तुमचा जिल्हा, पंप Capacity HP मध्ये आणि अर्ज कोणत्या वर्षी (Year of Installation ) केला होता, निवडून Go या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर ज्या लाभार्थी शेतकर्यांच अँप्लिकेशन झाल असेल, त्यांच नाव, जिल्हा, गाव, सोलर कोणत्या कंपनीचा भेटलेला आहे. इत्यादी सर्व माहिती तिथे PDF स्वरूपात दिसेल.
सोलर पंप योजनेची लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी डाव्या कोपर्यात PDF आयकॉन हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून फाईल SAVE करू शकता. तुमच नाव सोलर पंप योजनेच्या लाभार्थी यादीत आहे का पाहू शकता.
सोलर पंप मंजूर यादीत नाव नसल्यास काय करावे ?
- आपला अर्ज क्रमांक आणि जिल्हा परत एकदा तपासून पुन्हा शोधा.
- MEDA किंवा MSEDCL कार्यालयाशी थेट संपर्क करा.
- स्थानिक कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीकडे चौकशी करा. सविस्तर माहितीसाठी त्वरित संपर्क करा.