Land Records

शेतजमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहा | Mahabhunakasha Maharashtra : Check Farm Land Map Online

नमस्कार मित्रांनो, आपल्या शेतजमिनीचा नकाशा पाहण्यासाठी आता तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. आता तुम्ही मोबाईलवरून घरबसल्या तुमच्या स्वतःच्या जमिनीचा, नातेवाईकांच्या जमिनीचा, अगदी गावातील इतर कोणत्याही व्यक्तीच्या जमिनीचा नकाशा काही मिनिटांत पाहू शकता.

आजच्या डिजिटल काळात शासनाने अनेक महत्त्वाच्या सेवा ऑनलाईन केल्या आहेत. यामुळे शेतकरी, जमीनमालक, खरेदीदार आणि सामान्य नागरिक यांना जमिनीच्या हद्दी, क्षेत्रफळ, शेजारील जमीन, रस्ते आणि इतर तपशील सहज समजू शकतात. त्यामुळे वेळ वाचतो, धावपळ कमी होते आणि माहिती पटकन मिळते.

शेतजमीन खरेदी-विक्री, वारसा नोंद, कर्ज प्रकरण किंवा शेतीचे नियोजन करताना जमिनीचा नकाशा पाहणे खूप महत्त्वाचे असते. अशा वेळी ऑनलाईन नकाशा मोठी मदत करतो आणि व्यवहारात स्पष्टता आणतो. त्यामुळे शेतजमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा हे तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

महाराष्ट्र Mahabhunakasha कसा पाहायचा

मित्रांनो, सर्वात पहिले आपल्या राज्याच्या अधिकृत भू-अभिलेख किंवा भु-नकाशा च्या bhumiabhilekh.maharashtra.gov.in या पोर्टल वर जायचं आहे. मित्रांनो, नुकतेच हे पोर्टल अद्ययावत करण्यात आले आहे.

मित्रांनो, या पोर्टल वर शेतकरी व नागरिक आपला नकाशा दोन प्रकारे पाहू शकतात – 1) महाभू-नकाशा 2) नकाशा पद्धतीने

पहिली पद्धतमहाभू-नकाशा

स्टेप 1 :- मित्रांनो, पोर्टल च्या होम पेज वर आल्यावर थोडं खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला निःशुल्क हा पर्याय दिसेल. यात काही ऑप्शन दिलेले आहेत. त्यातील महाभू-नकाशा (जमिनीच्या नोंदींसह नकाशे) या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

स्टेप 2 :- त्या नंतर त्याच्या शेजारी दिलेल्या ‘सेवांवर जा’ या बटन वर क्लिक करायचं आहे. या नंतर तुम्ही भु-नकाशा च्या पेज वर जाल.

स्टेप 3 :- आता इथे डाव्या बाजूला location मध्ये तुम्हाला सर्वात पहिले तुमचं राज्य म्हणजे महाराष्ट्र दाखवले जाईल. त्याखाली category मध्ये तुम्हाला ज्या भागातील नकाशा पहायचा आहे त्यानुसार rural (ग्रामीण भागासाठी) किंवा urban (शहरी भागासाठी) सिलेक्ट करायचं आहे. त्या नंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडायच आहे.

नोट: नकाशा पाहण्यासाठी बाणावरती (arrow) क्लिक करा

स्टेप 4 :- मित्रांनो, एवढी माहिती टाकल्यावर तुम्हाला त्या गावाचा नकाशा दाखवला जाईल.

स्टेप 5 :- पण तुम्हाला गावातील एका ठराविक प्लॉट चा नकाशा बघायचा असेल तर त्या साठी खाली दिलेल्या search plot number या ऑप्शन मध्ये जमिनीचा प्लॉट नंबर टाकायचा आहे. आता तुमच्या समोर तो प्लॉट दाखवला जाईल.

मित्रांनो, या शिवाय खाली अजून एक दिलेल्या ऑप्शन मध्ये त्या प्लॉट मधील सर्व सर्वे नंबर दिलेले आहेत. इथे तुम्ही तुमचा सर्वे नंबर टाकून तुमच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता.

स्टेप 6 :- तसेच या खाली त्या जमिनी बद्दल ची इतर काही माहिती सुद्धा दिसेल, ज्यात जमिनीचा सर्वे नंबर, एकूण क्षेत्र, मालकाचे नाव असेल. याच्या खाली अजून एक map report चा ऑप्शन देण्यात आला आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही त्या नकाशाला डाउनलोड करून शकता किंवा त्याची प्रिंट काढू शकता.

मित्रांनो, हा नकाशा तुम्ही सरकारी कामासाठी वापरू शकत नाहीत. फक्त तुम्हाला जमिनीच्या नकाशा बद्दलची व त्या संबंधित इतर माहिती जाणून घेता येईल. म्हणजेच या नकाशाचा उपयोग फक्त तुम्हाला जमिनीची माहिती मिळण्यासाठी होईल, सरकारी कामासाठी नाही.

पहिली पद्धतमहाभू-नकाशा

स्टेप 1 :- मित्रांनो, आता याच पोर्टल वर देण्यात आलेला अजून एक ऑप्शन म्हणजे ई नकाशा. त्याद्वारे जमिनीचा नकाशा फ्री मध्ये बघू शकता. नकाशा बघण्यासाठी वर दिलेल्या ‘नकाशा’ या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 2 :- त्या नंतर तुमच्या समोर महाराष्ट्राचा नकाशा ओपन होईल. त्यात तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावर क्लिक करायचं आहे.

स्टेप 3 :- त्या नंतर तुमच्या समोर जिल्ह्याचा नकाशा ओपन होईल. आता डाव्या बाजूला परत Rural म्हणजे 7/12 व Urban म्हणजे Property Card यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे व नंतर खाली तुमचा जिल्हा ,तालुका व गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे.

नंतर तुम्ही सर्वे नंबर टाकायचा आहे व ज्या स्केल मध्ये नकाशा पहायचा आहे ती स्केल सिलेक्ट करायची आहे.

त्या नंतर तुम्हाला नकाशा दाखवला जाईल, सोबतच त्या सर्वे नंबर बद्दल सर्व माहिती दाखवली जाईल, ज्यात सर्वे नंबर, त्याचे क्षेत्र, मालकाच नाव,ULPIN नंबरवगैरे.. या नकाशाची तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर Print या बटन वर क्लिक करून तुम्ही जमिनीच्या नकाशाची प्रिंट काढून घेऊ शकता.

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात Mahabhulekh व Bhunaksha पोर्टलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. असे असले तरीही ऑनलाईन उपलब्ध असलेला हा शेतजमिनीचा नकाशा फक्त माहितीच्या उद्देशासाठी वापरता येतो. जमीन खरेदी-विक्री किंवा सरकारी न्यायालयीन कामासाठी हा नकाह वापरता येणार नाही. तसेच प्रमाणित नकाशा हवा असल्यास तुम्हाला तो संबंधित कार्यालयातून घ्यावा लागेलं.

महाभूनकाशा म्हणजे काय ?

Mahabhunakasha किंवा महाराष्ट्र महाभू नकाशा ही शेतजमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्यासाठी उपयुक्त सेवा आहे. या सुविधेमुळे नागरिकांना त्यांच्या जमिनीची हद्द, गट नंबर, सर्वे नंबर आणि स्थान याची माहिती घरबसल्या मिळू शकते. त्यामुळे शेतकरी, जमीनमालक आणि खरेदीदार यांच्यासाठी ही सेवा खूप उपयोगाची ठरते.

भू नकाशा महाराष्ट्र का महत्त्वाचा आहे ?

Bhu Naksha Maharashtra किंवा भू नकाशा महाराष्ट्र याच्या मदतीने जमिनीची अचूक रचना आणि सीमारेषा समजतात. जमीन खरेदी-विक्री, वारसा नोंद, शेती नियोजन, कर्ज प्रकरण आणि सरकारी कामांसाठी जमिनीचा नकाशा पाहणे महत्त्वाचे असते. ऑनलाईन नकाशा उपलब्ध असल्यामुळे वेळ आणि धावपळ दोन्ही कमी होतात.

महाभुलेख नकाशा आणि भूमी अभिलेख नकाशा यांचा उपयोग

Mahabhulekh Nakasha आणि Bhumi Abhilekh Nakasha हे शब्द अनेकदा जमिनीच्या ऑनलाईन नकाशाशी संबंधित शोधांमध्ये वापरले जातात. या माध्यमातून नागरिकांना जमिनीचा तपशील समजून घेणे सोपे जाते. विशेषतः गट नंबर किंवा सर्वे नंबरने जमीन शोधताना ही माहिती उपयुक्त ठरते.

महाभूमी नकाशा वर कोणती माहिती दिसते?

Mahabhumi Nakasha वर सामान्यतः जमिनीच्या हद्दी, क्षेत्रफळ, शेजारील जमीन, रस्ते आणि इतर स्थानिक तपशील दिसू शकतात. ही माहिती दृश्य स्वरूपात असल्यामुळे सामान्य व्यक्तीलाही जमिनीचे स्थान समजायला सोपे जाते. त्यामुळे व्यवहारात स्पष्टता वाढते आणि गोंधळ कमी होतो.

भू नकाशा महाराष्ट्र कोणासाठी उपयुक्त आहे?

Bhunaksha Maharashtra ही सेवा शेतकरी, जमीनमालक, खरेदीदार, वारसदार आणि गावातील इतर नागरिकांसाठी उपयुक्त आहे. स्वतःच्या जमिनीचा नकाशा पाहण्याबरोबरच नातेवाईकांच्या किंवा गावातील इतर व्यक्तींच्या जमिनीची माहिती तपासण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे जमिनीशी संबंधित प्राथमिक माहिती जलद मिळते.

जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहण्याचे फायदे

जमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहिल्यामुळे सरकारी कार्यालयात जाण्याची गरज कमी होते. भू नकाशाभू नकाशा महाराष्ट्रमहाभूनकाशा अशा सेवांमुळे जमिनीची माहिती मोबाईलवरून सहज मिळते. यामुळे वेळ वाचतो, सीमारेषा समजतात आणि पुढील कागदपत्रांच्या प्रक्रियेलाही मदत होते.

अधिकृत पोर्टलवरूनच नकाशा पाहावा

महाराष्ट्र महाभू नकाशामहाभूमी नकाशाभूनकाशा महाराष्ट्र यासंबंधित माहिती पाहताना अधिकृत पोर्टलचाच वापर करावा. यामुळे मिळणारी माहिती अधिक अचूक आणि विश्वासार्ह असते. चुकीच्या वेबसाइटवरून माहिती पाहिल्यास गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे अधिकृत संकेतस्थळाला प्राधान्य द्यावे.

FAQs

शेतजमिनीचा नकाशा ऑनलाईन पाहणे मोफत आहे का ?

हो मित्रांनो, शासनाच्या अधिकृत पोर्टल वर शेत जमिनीचा नकाशा पाहणे पूर्णपणे मोफत आहे.

मोबाईल वर शेतजमिनीचा नकाशा पाहता येतो का ?

हो मित्रांनो, तुम्ही तुमच्या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या मदतीने नकाशा सहज पाहू शकता.

नकाशामध्ये चूक आढळल्यास काय करावे ?

मित्रांनो, जर तुम्हाला नकाशात काही चूक आढळली तर अशा वेळी तुम्ही तलाठी किंवा भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधु शकता.



Related Posts

सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये) | 7/12 Online Download

मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या उताऱ्यावर कोणाकडे किती जमीन आहे, कोणाच्या मालकीची आहे याची माहिती दिलेली असते. त्यामुळे हा सातबारा उतारा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यासाठी,...

AnyRor Gujarat 7/12 8A Gujarat Land Record Online | Get a Old Land Record Online In Just 1 Minute

Anywhere Land Record in Gujarat State : Get Gujarat Old Land Records Online Now From 1955 to Till Today Any RoR Anywhere: Any RoR Gujarat Land Record – Check Your Land Records : In simple words,...

How to Check & Download Telangana Pahani, 1B/ Land Records Online

Land records are vital documents for landowners, farmers, property buyers, and financial institutions. In Telangana, land ownership and cultivation details are maintained through Pahani and ROR-1B (Record of Rights) documents. To improve transparency and provide easy...

Gujarat Village Maps | View and Download Your Village Map

Gujarat Village Maps provides a comprehensive overview of your village and its surrounding areas. It’s the quickest and easiest way to explore different categories, helping you locate local landmarks and points of interest. The Village Maps...

How to Check & Download Rajasthan Jamabandi Khewat/ Land Records Online in 2 Minutes

In the state of Rajasthan, The Jamabandi is an essential land document that acts as an official record of land ownership, rights, and other important information. Having a copy of the Jamabandi is essential for confirming...

How to Check & Download Punjab Jamabandi/ Land Records Online (Free)

You have probably heard of Jamabandi if you are a land transactioner in the state of Punjab. Typically, land records are referred to as Jamabandi. Any information pertaining to your land can be obtained through Jamabandi....

Check and Download Madhya Pradesh Khasra/ Khatauni Online

Friends, Today’s article that follows will be crucial to the people of Madhya Pradesh. You can check your Madhya Pradesh state’s Khasra/Khatauni (Land record) online while you’re relaxing at home after reading this article through to...

How to Check & Download Online Himachal Pradesh Jamabandi & Land Records

Himachal Pradesh is a stunning state in the mountains where land ownership is well-managed. To document every crucial detail about every parcel of land, they use a tool known as “Jamabandi.” Knowing how to obtain these...

Check & Download Orissa Khatian & Land Records Online

In the state of Orissa, land records are also known as Khatian or Record of Rights (ROR). You can instantly view the details of the land records also known as Khatian of any piece of land...

તમારા ગામનો HD નકશો જુઓ જિલ્લા તાલુકા પ્રમાણે ડાઉનલોડ કરો

તમારા ગામનો HD નકશો જુઓ જિલ્લા તાલુકા પ્રમાણે ડાઉનલોડ કરો :- મિત્રો તમારે ગુજરાતના તમામ ગામડાઓ તથા સિટીના ઓનલાઈન નકશા જોવા માગતા હો તો Gujarat All Village Maps ઓનલાઈન નકશો જોઈ શકો છો. ગુજરાતના તમામ ગામના...