Land Records

सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये) | 7/12 Online Download

मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या उताऱ्यावर कोणाकडे किती जमीन आहे, कोणाच्या मालकीची आहे याची माहिती दिलेली असते. त्यामुळे हा सातबारा उतारा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यासाठी, किंवा काही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी खूप आवश्यक मानला जातो.

थोडक्यात सांगायचे झाले तर, सातबारा उतारा हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याद्वारे राखला जातो आणि त्या मध्ये एका विशिष्ट भूखंडाचे संपूर्ण तपशील दिले जातात. हा सातबारा उतारा तुम्हाला बघायचा असल्यास तो तुम्ही महाभुलेख किंवा महाराष्ट्र भूमी अभिलेख च्या वेबसाइट वरून ऑनलाईन बघू शकता. मित्रांनो, हा सातबारा उतारा तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईल वरून फ्री मध्ये पाहू शकता फक्त कोणत्याही शासकीय बाबींसाठी तुम्ही हा उतारा वापरू शकत नाही. हा सातबारा उतारा ऑनलाइन कसा बघायचा ते जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

ऑनलाईन सातबारा (7/12) कसा बघायचा?

स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला महाभूमिलेख च्या ऑफिशियल वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in या वर जायचे आहे. वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुमच्याकडे Property UID नंबर आहे का? तिथे No निवडा.

स्टेप 2: आता पुढे दिसणाऱ्या पर्यायांमधून सातबारा (7/12) निवडा. यानंतर तुमचं जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव योग्यरित्या भरा.

SatBara Online Download in Marathi Step 2

स्टेप 3: आता Name (नाव) या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्ही जमीन मालकाचं नाव टाकून माहिती शोधू शकता. तुम्ही खालीलपैकी कोणत्याही पर्यायाने शोध घेऊ शकता:

  • First Name / पहिले नाव
  • Last Name / आडनाव
  • Middle Name / मधील नाव
  • Full Name / संपूर्ण नाव

या आर्टिकलमध्ये आपण आडनाव (Last Name) या पर्यायाने 7/12 डाउनलोड करण्याची पद्धत पाहत आहोत. आता तुम्ही जमीन मालकाचे आडनाव टाका आणि शोधा बटन वर क्लिक करा. नंतर त्या आडनावाशी संबंधित सर्व जमीनमालकांची यादी खाली दिसेल. योग्य नाव निवडा आणि त्यावर क्लिक करा.

नंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर, भाषा (मराठी/English) निवडा, आणि शेवट Captcha Code भरा आणि Submit बटन वर क्लिक करा.

SatBara Online Download in Marathi Step 4

स्टेप 4: मित्रांनो, आता पुढच्या पेज वर तुम्हाला सातबारा चा उतारा आलेला दिसेल. या उताऱ्यावर तुम्हाला ती शेतजमीन कोणाची आहे, किती क्षेत्र आहे, सर्वे नंबर, जमिनीचा किती आकार आहे वगैरे सर्व माहिती दिसेल.

SatBara Online Download in Marathi Step 5

महत्वाची गोष्ट: हा सातबारा तुम्ही कोणत्याही शासकीय बाबींसाठी वापरू शकत नाही. शासकीय कामासाठी डिजिटल सातबारा लागतो. तुम्हाला जर डिजिटल सातबारा म्हणजे काय आणि तो ऑनलाईन कसा मिळवायचा याबद्दल माहिती पाहिजे असेल तर हा लेख वाचा

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ऑनलाईन सातबारा कसा बघायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. हा सातबारा उतारा बघण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त मोबाईल वरून तुम्ही सातबारा उतारा पाहू शकता. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.

Related Posts

AnyRor Gujarat 7/12 8A Gujarat Land Record Online | Get a Old Land Record Online In Just 1 Minute

Anywhere Land Record in Gujarat State : Get Gujarat Old Land Records Online Now From 1955 to Till Today Any RoR Anywhere: Any RoR Gujarat Land Record – Check Your Land Records : In simple words,...

How to Check & Download Telangana Pahani, 1B/ Land Records Online

Land records are vital documents for landowners, farmers, property buyers, and financial institutions. In Telangana, land ownership and cultivation details are maintained through Pahani and ROR-1B (Record of Rights) documents. To improve transparency and provide easy...

Gujarat Village Maps | View and Download Your Village Map

Gujarat Village Maps provides a comprehensive overview of your village and its surrounding areas. It’s the quickest and easiest way to explore different categories, helping you locate local landmarks and points of interest. The Village Maps...

How to Check & Download Rajasthan Jamabandi Khewat/ Land Records Online in 2 Minutes

In the state of Rajasthan, The Jamabandi is an essential land document that acts as an official record of land ownership, rights, and other important information. Having a copy of the Jamabandi is essential for confirming...

How to Check & Download Punjab Jamabandi/ Land Records Online (Free)

You have probably heard of Jamabandi if you are a land transactioner in the state of Punjab. Typically, land records are referred to as Jamabandi. Any information pertaining to your land can be obtained through Jamabandi....

Check and Download Madhya Pradesh Khasra/ Khatauni Online

Friends, Today’s article that follows will be crucial to the people of Madhya Pradesh. You can check your Madhya Pradesh state’s Khasra/Khatauni (Land record) online while you’re relaxing at home after reading this article through to...

How to Check & Download Online Himachal Pradesh Jamabandi & Land Records

Himachal Pradesh is a stunning state in the mountains where land ownership is well-managed. To document every crucial detail about every parcel of land, they use a tool known as “Jamabandi.” Knowing how to obtain these...

Check & Download Orissa Khatian & Land Records Online

In the state of Orissa, land records are also known as Khatian or Record of Rights (ROR). You can instantly view the details of the land records also known as Khatian of any piece of land...

તમારા ગામનો HD નકશો જુઓ જિલ્લા તાલુકા પ્રમાણે ડાઉનલોડ કરો

તમારા ગામનો HD નકશો જુઓ જિલ્લા તાલુકા પ્રમાણે ડાઉનલોડ કરો :- મિત્રો તમારે ગુજરાતના તમામ ગામડાઓ તથા સિટીના ઓનલાઈન નકશા જોવા માગતા હો તો Gujarat All Village Maps ઓનલાઈન નકશો જોઈ શકો છો. ગુજરાતના તમામ ગામના...

How to Check Land Records State/UT RoR, Land record all states

In accordance with the NIC’s proposal, the government of Assam has approved the payment of Rs. 48,65,148/-through letter RRG.77/2015/11 DTD.25-6-2016, for the implementation of the BHUNAKSHA digital cadastral maps software in revenue circle offices. For the...