
मित्रांनो, आपल्या आधार कार्ड, पॅन कार्ड प्रमाणेच ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) हे देखील एक खूप महत्त्वाचे असे सरकारी कागदपत्र आहे. आपले ओळखपत्र म्हणून ही ड्रायव्हिंग लायसन्सचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. मित्रांनो, अनेकदा कार किंवा बाईक चालवत असताना आपण आपले ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवायला विसरतो आणि परिणामी पकडले गेल्यावर चलान भरावे लागते.
पण मित्रांनो, आता तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स जवळ ठेवायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स ची हार्ड कॉपी जवळ न बाळगता देखील गाडी चालवू शकता. कारण डिजिटल इंडिया मोहिमे अंतर्गत, भारत सरकारने तुमच्या कागदपत्रांना डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठी DigiLocker हे ऍप लाँच केले आहे. ज्यामुळे आपल्या सारख्या सामान्य लोकांना त्यांची महत्त्वाची कागदपत्रे नेहमी सोबत ठेवण्याची सक्ती राहणार नाही आणि ती कागदपत्रे देखील सुरक्षित राहतील.
मित्रांनो, बऱ्याच लोकांना माहिती आहे की डिजिलॉकर मुळे आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स जवळ बाळगण्याची गरज नाही. परंतु DigiLocker वर ड्रायव्हिंग लायसन्स ऍड कसे करायचे? या बद्दल बऱ्याच लोकांना अद्यापही माहिती नाही. पण मित्रांनो, काळजी करू नका. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. त्यामुळे आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा….
DigiLocker वर ड्रायव्हिंग लायसन्स ऍड करणे
DigiLocker वर ड्रायव्हिंग लायसन्स ऍड कसे करायचे? या बद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:-
स्टेप 1 : मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर वरून DigiLocker हे ऍप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

स्टेप 2 : व त्यात रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला Sign In करायचं आहे. यात जर तुमचे आधीच अकाउंट तयार केलेले असेल तर तुम्ही डायरेक्ट Sign In करायचे आहे.

स्टेप 3 : मित्रांनो, या नंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील. Mobile आणि Aadhar किंवा Username. यांना रजिस्ट्रेशन करतानाच तुम्हाला सेट करून ठेवायचं आहे व तुमचा पासवर्ड किंवा सहा अंकी सिक्युरिटी पिन सेट करून ठेवायचा आहे. व अश्या प्रकारे तुम्ही डिजिलॉकर अकाउंट मध्ये साइन इन करून घ्यायच आहे.

स्टेप 4 : आता नेक्स्ट इंटरफेस मध्ये तुम्हाला खाली दिलेल्या Search ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर थोडं खाली स्क्रोल करून कॅटेगरिझ मध्ये Transport या ऑप्शन मध्ये जायचे आहे.

स्टेप 5 : त्या नंतर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स ज्या राज्याचं (State) आहे, ते राज्य सिलेक्ट करायचे आहे.

स्टेप 6 : त्या नंतर नेक्स्ट पवज वर Driving license वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 7 : त्या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमची माहिती विचारली जाईल, ज्यात तुमचा आधार नंबर व ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकायचा आहे व नंतर Get Document ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 8 : मित्रांनो, या नंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स इथे ऍड होऊन जाईल. तुमचे जे पण डॉउमेन्ट ऍड केलेले असतील ते तुम्हाला My issued Documents या सेक्शन मध्ये दिसतील. तसेच जेव्हा तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स दाखवायची गरज पडेल तेव्हा तुम्ही my issued documents मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स वर क्लिक करून तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण DigiLocker वर ड्रायव्हिंग लायसन्स ऍड कसे करायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.