Government Services

DigiLocker वर ड्रायव्हिंग लायसन्स ऍड कसे करायचे ? | How to Add Driving License in DigiLocker

मित्रांनो, आपल्या आधार कार्ड, पॅन कार्ड प्रमाणेच ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) हे देखील एक खूप महत्त्वाचे असे सरकारी कागदपत्र आहे. आपले ओळखपत्र म्हणून ही ड्रायव्हिंग लायसन्सचा उपयोग अनेक ठिकाणी केला जातो. मित्रांनो, अनेकदा  कार किंवा बाईक चालवत असताना आपण आपले ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवायला विसरतो आणि परिणामी पकडले गेल्यावर चलान भरावे लागते.

पण मित्रांनो, आता तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स जवळ ठेवायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स ची हार्ड कॉपी जवळ न बाळगता देखील गाडी चालवू शकता. कारण डिजिटल इंडिया मोहिमे अंतर्गत, भारत सरकारने तुमच्या कागदपत्रांना डिजिटल स्वरूपात ठेवण्यासाठी DigiLocker हे ऍप लाँच केले आहे. ज्यामुळे आपल्या सारख्या सामान्य लोकांना त्यांची महत्त्वाची कागदपत्रे नेहमी सोबत ठेवण्याची सक्ती राहणार नाही आणि ती कागदपत्रे देखील सुरक्षित राहतील.

मित्रांनो, बऱ्याच लोकांना माहिती आहे की डिजिलॉकर मुळे आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स जवळ बाळगण्याची गरज नाही. परंतु DigiLocker वर ड्रायव्हिंग लायसन्स ऍड कसे करायचे? या बद्दल बऱ्याच लोकांना अद्यापही माहिती नाही. पण मित्रांनो, काळजी करू नका. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. त्यामुळे आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा….

DigiLocker वर ड्रायव्हिंग लायसन्स ऍड करणे

DigiLocker वर ड्रायव्हिंग लायसन्स ऍड कसे करायचे? या बद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:-

स्टेप 1 : मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर वरून DigiLocker हे ऍप डाउनलोड करून घ्यायचे आहे.

Driving License Digilocker App Madhe Add Karne Step 1

स्टेप 2 : व त्यात रजिस्ट्रेशन करायचे आहे. रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्हाला Sign In करायचं आहे. यात जर तुमचे आधीच अकाउंट तयार केलेले असेल तर तुम्ही डायरेक्ट Sign In करायचे आहे.

Driving License Digilocker App Madhe Add Karne Step 2

स्टेप 3 : मित्रांनो, या नंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील. Mobile आणि Aadhar किंवा Username. यांना रजिस्ट्रेशन करतानाच तुम्हाला सेट करून ठेवायचं आहे व तुमचा पासवर्ड किंवा सहा अंकी सिक्युरिटी पिन सेट करून ठेवायचा आहे. व अश्या प्रकारे तुम्ही डिजिलॉकर अकाउंट मध्ये साइन इन करून घ्यायच आहे.

Driving License Digilocker App Madhe Add Karne Step 3

स्टेप 4 : आता नेक्स्ट इंटरफेस मध्ये तुम्हाला खाली दिलेल्या Search ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर थोडं खाली स्क्रोल करून कॅटेगरिझ मध्ये Transport या ऑप्शन मध्ये जायचे आहे.

Driving License Digilocker App Madhe Add Karne Step 4

स्टेप 5 : त्या नंतर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स ज्या राज्याचं (State) आहे, ते राज्य सिलेक्ट करायचे आहे.

Driving License Digilocker App Madhe Add Karne Step 5

स्टेप 6 : त्या नंतर नेक्स्ट पवज वर Driving license वर क्लिक करायचे आहे.

Driving License Digilocker App Madhe Add Karne Step 6

स्टेप 7 : त्या नंतर नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमची माहिती विचारली जाईल, ज्यात तुमचा आधार नंबर व ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाकायचा आहे व नंतर Get Document ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Driving License Digilocker App Madhe Add Karne Step 7

स्टेप 8 : मित्रांनो, या नंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स इथे ऍड होऊन जाईल. तुमचे जे पण डॉउमेन्ट ऍड केलेले असतील ते तुम्हाला My issued Documents या सेक्शन मध्ये दिसतील. तसेच जेव्हा तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स दाखवायची गरज पडेल तेव्हा तुम्ही my issued documents मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स वर क्लिक करून तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स दाखवू शकता.

Driving License Digilocker App Madhe Add Karne Step 8

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण DigiLocker वर ड्रायव्हिंग लायसन्स ऍड कसे करायचे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

Related Posts

सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये) | 7/12 Online Download

नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑनलाईन पद्धतीने फ्री मध्ये सातबारा कसा बघायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या उताऱ्यावर कोणाकडे किती जमीन आहे, कोणाच्या मालकीची...

Complete Guide to Online PAN Card Application 2024

A PAN (Permanent Account Number) Card is essential for filing Income Tax Returns in India. It’s crucial to ensure that all information on the card is up-to-date and accurate. This article will guide you through the steps to update or...

ESIC कार्ड डाउनलोड करा Free मध्ये मोबाईल वर | Download ESIC e Pehchan Card

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर ESIC मेंबर असाल म्हणजेच तुम्ही जर ESIC योजनेत सामील असाल तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ESIC कार्ड मिळते आणि या कार्डच्या मदतीने तुम्ही ESIC दवाखान्यात किंवा हॉस्पिटल मध्ये कोणताही खर्च न करता कोणत्याही आजारावर उपचार करू...

शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर किती धान्य मिळते, Free मध्ये चेक करा | How to Check Ration Card Details Online

नमस्कार मित्रांनो, आज आपण शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर तुम्हाला किती धान्य मिळायला पाहिजे, व दुकानदार किती धान्य देतो, याचा तपशील ऑनलाईन चेक कसे करायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमचे रेशन कार्ड हे तुमच्या ओळखीचा पुरावा...

How to Apply for Driving License Online 2024

A driving license, often referred to as a driver’s license, is a crucial document that permits an individual to operate a motor vehicle legally. It serves as both an identification and authorization to drive, granted after the successful completion of...

How to Update Aadhaar Card Online 2024

Aadhaar Card Update Process : The Aadhaar Card is required for any government scheme or booking train tickets. Many people have not yet updated their Aadhaar card, so in this situation, UIDAI is providing the facility to update the Aadhaar...

Ayushman Card Download 2024

क्या आपके पास आयुष्मान कार्ड है ? The Ayushman Bharat Scheme, also known as the Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY), is a government healthcare program in India launched by the Government of India in September 2018. The primary goal...

पैन कार्ड के लिए ऑनलाइन आवेदन करने की पूरी जानकारी 2024

आयकर विभाग ने पैन कार्ड के ऑनलाइन आवेदन के लिए मुख्य रूप से प्रोटीन ईगॉव टेक्नोलॉजीज लिमिटेड (पूर्व में एनएसडीएल) को काम सौंपा है। इसके अलावा पैन कार्ड के आवेदन के लिए आईटी विभाग द्वारा यूटीआई इंफ्रास्ट्रक्चर एंड सर्विसेज लिमिटेड...

How to Apply for Labour Card Online 2024

India, ranking second in global population, has approximately 500 million workers employed as laborers and on contractual basis across diverse sectors including agriculture, construction, and various industries. The Ministry of Labour and Employment, one of the longest-standing and most crucial...

गाडीवर असलेला E-Challan फाइन ऑनलाईन कसा भरावा | फाइन ऑनलाईन कसा चेक करावा | Traffic E-Challan Maharashtra

नमस्कार मिञांनो, तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी गाडी चालवत असताना तुमच्याकडून कळत नकळत चुका होत असतात, जसे कि सिग्नल तोडला जाणे, हेल्मेट न वापरणे, ओव्हर स्पीडींग, नो पार्किंग मध्ये पार्किंग करणे इत्यादी. तर अश्या अनेक कारणांमुळे तुम्हाला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांकडून दंड...