बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच पात्र बांधकाम कामगारांना घर बांधणी व इतर कामांसाठी निधी उपलब्ध करून देणे आहे.
या संदर्भात दिनांक 7 फेब्रुवारी 2019 रोजी जीआर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे जर तुम्हाला हा जीआर सविस्तरपणे बघायचा असेल तर जीआर डाउनलोड तुम्हाला लेखाच्या शेवटी दिलेली आहे. हा जीआर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थित रित्या बघू शकता.
या योजनेचा लाभ नोंदणी सक्षम असलेल्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे. ज्या लाभार्थ्यांची नोंदणी सक्षम असेल त्यांनी लवकरात लवकर त्यांची बांधकाम कामगार नोंदणी सक्षम करावी किंवा बांधकाम कामगार च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन रिन्यूअल करून घ्यावे.
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना स्वतःचे घर उपलब्ध करून देणे आहे. ज्या लाभार्थ्यांना स्वतःचे पक्के घर नाही अशा लाभार्थ्यांना स्वतःचे घर उपलब्ध होणार आहे.
अटल बांधकाम कामगार आवास योजना कोणते लाभार्थी आहे पात्र
अटल बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या लाभार्थ्यांनी बांधकाम कामगार नोंदणी केलेली आहे असे लाभार्थी या ठिकाणी पात्र ठरणार आहे.
नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांची नोंदणी ही सक्रिय असायला हवी. ज्या लाभार्थ्यांची नोंदणी सक्रिय नाही त्या लाभार्थ्यांना हा लाभ दिल्या जाणार नाही त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी सक्रिय करून घ्या.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावाने किंवा लाभार्थ्याच्या पत्नीच्या नावाने पक्की घर नसावी अथवा योजनेचा लाभ मिळणार नाही.
कोणते कागदपत्रे आहे आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे हे कागदपत्रे कोणते आहे बघा खालील प्रमाणे.
सक्षम प्राधिकार्याने दिलेले ओळखपत्र.
आधार कार्ड.
सातबारा.
बँक पासबुक.
पासपोर्ट फोटो.
पात्र लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळातर्फे एक लाख पन्नास हजार ते दोन लाखापर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
असा करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज तुम्ही ऑफलाइन पद्धतीने सुद्धा करू शकता. अर्जाचा नमुना तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे खालील बटणावरती क्लिक करून तुम्ही हा अर्ज तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता.
या फॉर्ममध्ये तुम्हाला काही माहिती विचारल्या जाईल ती माहिती तुम्हाला योग्यरीत्या भरायची आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो सुद्धा या ठिकाणी लागणार आहे.