Govt Schemes

Favarni Pump Yojana 2024 : शेतकऱ्यांनो बॅटरी फवारणी पंपासाठी ऑनलाइन अर्ज सुरू; मोबाईलवरून 5 मिनिटांत असा करा पंपासाठी अर्ज..

Battery Favarni  Pump MahaDBT Yojana 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना शेती करताना बऱ्याच उपकरणांची गरज भासत असते. जर शेतकऱ्याकडे स्वतःची उपकरणे असतील तर त्या शेतकऱ्यांना शेतीतून चांगला फायदा मिळतो. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची उपकरणे नसतात त्यांना ती भाड्याने घ्यावी लागतात त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीत बराच खर्च होत असतो. त्यामुळे शेतीतील कृषी यंत्रांची (Agricultural Machinery) उपयुक्तता लक्षात घेऊन सरकार (Maharashtra Government) शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर कृषी यंत्रांवर अनुदानाचा लाभ देते.

राज्य पुरस्कृत एकात्मिक पिकांची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४- २५ योजनेत बॅटरी संचलित फवारणी यंत्र (Battery Favarni Pump) वितरीत करण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेत वैयक्तिक शेतकरी यांना बॅटरी संचलित फवारणी पंप (Battery Favarni Pump – Battery Spray Pump) अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या बाबीच्या लाभासाठी खालील महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करावे लागणार आहे.

बॅटरी फवारणी पंपासाठी पात्रता

  •  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
  •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल

बॅटरी फवारणी पंपासाठी आवश्यक कागदपत्रे

  •  आधार कार्ड
  •  ७/१२ उतारा
  •  ८ अ दाखला
  •  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  •  जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  •  स्वयं घोषणापत्र
  •  पूर्वसंमती पत्र

बॅटरी फवारणी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस (Battery Favarni Pump MahaDBT Yojana )

योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे. https://mahadbt.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.

शेतकरी मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील आपले सरकार केंद्र इ. माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.

वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा.

ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व हा नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.

अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

पुढे अर्ज करा अशी लिंक शोधून त्यावर क्लिक करा. कृषी यांत्रिकीकरण या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर क्लिक करा.

आता एक अर्ज ओपन होईल त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरा जसे कि मुख्य घटक या चौकटीमध्ये क्लिक करून कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय निवडा.

तपशील या चौकटीवर क्लिक करून मनुष्यचलीत औजारे हा पर्याय निवडा. यंत्रसामग्री औजारे या पर्यायावर क्लिक करून पीक सरंक्षण औजारे हा पर्याय निवडा.

पुढे मशीनचा प्रकार मध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप (कापूस/गळितधान्य) Battery Favarni Pump प्रकार निवडा.

योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये टिक करा आणि जतन करा या बटनावर क्लिक करा.

तुम्हाला अजून काही अर्ज करायचे असेल तर yes या बटनावर क्लिक करा नसेल तर No या बटनावर क्लिक करा. आपण फक्त बॅटरी संचलित फवारणी (Battery Spray Pump) पंपासाठी अर्ज करत आहोत त्यामुळे No या बटनावर क्लिक करणार आहोत.

अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा. सूचना वाचून घ्या आणि ओके बटनावर क्लिक करा.

आता पुढे पहा या बटनावर क्लिक करा. या ठिकणी तुम्ही जर एकापेक्षा अनेक योजनांसाठी अर्ज केला असेल तर त्या योजनांना प्राधान्य क्रमांक द्यावा लागेल, तो देवून टाका.

योजनेच्या अटी आणि शर्थी मान्य करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

बॅटरी संचलित फवारणी पंपासाठी तुम्हाला २३.६० एवढे शुल्क भरावे लागणार आहे त्यासाठी Make Payment या बटनावर क्लिक करा.

पेमेंट करण्याचा पर्याय निवडा. Proceed for Payment या पर्यायावर क्लिक करा. पेमेंट करण्याचे अनेक पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुम्हाला जो सोपा वाटेल तो पर्याय निवडून पेमेंट करा. शक्यतो क्यूआर कोड हा पर्याय पेमेंट करण्यासठी वापरा कारण तो अधिक सोपा आहे. पेमेंटची पावती प्रिंट करून घ्या.

बॅटरी फवारणी पंपाच्या अर्जाचे स्टेटस पहा (Battery Favarni Pump MahaDBT Application Status)

महा डीबीटीवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्या वतीने दर हफ्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात यामध्ये जर तुमच्या अर्जाची निवड झाली तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येईल त्यानुसार कागदपत्रे अपलोड करून द्या.

तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाचे स्टेट्स बघायचे असेल तर मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा.

छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील दिसेल. अर्जाची पोहोच पावती देखील तुम्ही डाउनलोड करू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही बॅटरी फवारणी पंपासाठी (Battery Favarni Pump) अर्ज सादर करू शकता. याबाबत अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

महाडीबीटी पोर्टल : https://mahadbt.maharashtra.gov.in/

महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप : महाडीबीटी शेतकरी अ‍ॅप मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना : ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सूचना PDF फाईल डाउनलोड करण्यासाठी :- इथे क्लिक करा.

Related Posts

Berojgari Bhatta Yojana Apply Online 2024

Berojgari Bhatta Yojana Online Apply : बेरोजगार छात्र-छात्राओं को सरकार बेरोजगार भत्ता देगी इस के लिये बेरोजगारी भत्ता योजना शुरू की है। इस योजना के लिए आवेदन करना भी आसान है। इस योजना के माध्यम से...

महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना | Maharashtra Pink E Rickshaw Yojana 2024 Apply Online

महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना: या योजनेअंतर्गत राज्यातील 17 शहरांतल्या 10 हजार महिलांना पिंक ई-रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन दिले जाते. राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी,...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ऑनलाईन अर्ज स्वतः भरा अँप मधून | Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी व मुलींसाठी सरकार वेळोवेळी नवं नवीन योजना राबवित असते. त्यातच नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारने महिलांसाठी...

Agriculture Loan Scheme 2024 Apply Online

Kisan Karj Mafi Yojana (Farmer Loan Waiver Scheme) : The national government is implementing new programs to benefit all farmers, providing significant relief to the agricultural community. One such initiative is the Farmer Loan Waiver Scheme,...

Vahli Dikri Yojana Gujarat 2024 Apply Online

Vahli Dikri Yojana Gujarat 2024: वाहली दिकरी योजना (Vahli Dikri Yatra) गुजरात सरकार द्वारा शुरू की गई है। जिस परिवार में बेटी का जन्म होता है उस परिवार को राज्य सरकार द्वारा वित्तीय सहायता प्रदान की जाती...

Manav Kalyan Yojana 2024 Apply Online | માનવ કલ્યાણ યોજના 2024 ઓનલાઈન અરજી કરો

The Gujarat government has launched a new scheme to provide financial assistance to its state’s citizens. The scheme is called Manav Kalyan Yojana 2024. The Manav Kalyan Yojana has been developed with the aim of economic...

Ikhedut Portal Yojana 2024 :ગુજરાત ખેતીવાડી ની યોજનાઓ 2024

Ikhedut Portal Yojana | ગુજરાત ખેતીવાડી ની યોજનાઓ 2024 : ગુજરાત સરકાર દ્વારા અલગ અલગ વર્ગો માટે વિવિધ યોજનાઓ ચાલુ કરવામાં આવી છે. આ તમામ યોજનાઓ ની ઓનલાઈન અરજી માટે ગુજરાત સરકાર દ્વારા એક ઓનલાઇન પોર્ટલ...

Free Silai Machine Yojana 2024 Apply Online

The “Sewing Machine Scheme” is an initiative carried out by the Haryana Labour Welfare Board (HLWB), which falls under the Labour Department of the Government of Haryana. This scheme provides financial aid amounting to ₹4,500/- to...

Free Scooty Scheme 2024 Apply Online

The government has recently released a notification for the Electric Scooter Yojana, a scheme administered by the Labor Department, with a specific focus on the daughters of registered construction workers. Aspiring individuals meeting the eligibility criteria...

Apply Online for Free Scooty Yojana 2024

The Haryana government has recently announced the Electric Scooter Yojana, an initiative managed by the Labor Department, specifically designed for the daughters of registered construction workers. Interested candidates who meet the eligibility requirements can now submit...