मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या उताऱ्यावर कोणाकडे किती जमीन आहे, कोणाच्या मालकीची आहे याची माहिती दिलेली असते. त्यामुळे हा सातबारा उतारा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यासाठी, किंवा काही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी खूप आवश्यक मानला जातो.
थोडक्यात सांगायचे झाले तर, सातबारा उतारा हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याद्वारे राखला जातो आणि त्या मध्ये एका विशिष्ट भूखंडाचे संपूर्ण तपशील दिले जातात. हा सातबारा उतारा तुम्हाला बघायचा असल्यास तो तुम्ही महाभुलेख किंवा महाराष्ट्र भूमी अभिलेख च्या वेबसाइट वरून ऑनलाईन बघू शकता. मित्रांनो, हा सातबारा उतारा तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईल वरून फ्री मध्ये पाहू शकता फक्त कोणत्याही शासकीय बाबींसाठी तुम्ही हा उतारा वापरू शकत नाही. हा सातबारा उतारा ऑनलाइन कसा बघायचा ते जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
ऑनलाईन सातबारा (7/12) कसा बघायचा?
स्टेप 1: मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला महाभूमिलेख च्या ऑफिशियल वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in या वर जायचे आहे. वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुमच्याकडे Property UID नंबर आहे का? तिथे No निवडा.
स्टेप 2: आता पुढे दिसणाऱ्या पर्यायांमधून सातबारा (7/12) निवडा. यानंतर तुमचं जिल्हा, तालुका आणि गावाचं नाव योग्यरित्या भरा.

स्टेप 3: आता Name (नाव) या पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्ही जमीन मालकाचं नाव टाकून माहिती शोधू शकता. तुम्ही खालीलपैकी कोणत्याही पर्यायाने शोध घेऊ शकता:
- First Name / पहिले नाव
- Last Name / आडनाव
- Middle Name / मधील नाव
- Full Name / संपूर्ण नाव
या आर्टिकलमध्ये आपण आडनाव (Last Name) या पर्यायाने 7/12 डाउनलोड करण्याची पद्धत पाहत आहोत. आता तुम्ही जमीन मालकाचे आडनाव टाका आणि शोधा बटन वर क्लिक करा. नंतर त्या आडनावाशी संबंधित सर्व जमीनमालकांची यादी खाली दिसेल. योग्य नाव निवडा आणि त्यावर क्लिक करा.
नंतर रजिस्टर्ड मोबाईल नंबर, भाषा (मराठी/English) निवडा, आणि शेवट Captcha Code भरा आणि Submit बटन वर क्लिक करा.

स्टेप 4: मित्रांनो, आता पुढच्या पेज वर तुम्हाला सातबारा चा उतारा आलेला दिसेल. या उताऱ्यावर तुम्हाला ती शेतजमीन कोणाची आहे, किती क्षेत्र आहे, सर्वे नंबर, जमिनीचा किती आकार आहे वगैरे सर्व माहिती दिसेल.

महत्वाची गोष्ट: हा सातबारा तुम्ही कोणत्याही शासकीय बाबींसाठी वापरू शकत नाही. शासकीय कामासाठी डिजिटल सातबारा लागतो. तुम्हाला जर डिजिटल सातबारा म्हणजे काय आणि तो ऑनलाईन कसा मिळवायचा याबद्दल माहिती पाहिजे असेल तर हा लेख वाचा
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ऑनलाईन सातबारा कसा बघायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. हा सातबारा उतारा बघण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त मोबाईल वरून तुम्ही सातबारा उतारा पाहू शकता. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.