नमस्कार मित्रांनो! आजच्या नव्या लेखात आपले मनःपूर्वक स्वागत. आम्ही नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी एक नवीन आणि अत्यंत उपयुक्त विषय घेऊन आलो आहोत. आज आपण ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) साठी वापरल्या जाणाऱ्या Digital Crop Survey 3.0 या मोबाइल अपबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या एकाच अपद्वारे आता पीक सर्वेक्षण केले जाणार आहे, त्याबद्दलची सर्व महत्त्वाची माहिती आपण या लेखातून समजून घेऊ.
मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी विविध योजना आणि सुविधा उपलब्ध करून देतात. यामध्ये अनुदान, पीक विमा आणि नुकसान भरपाई यांसारख्या महत्त्वपूर्ण लाभांचा समावेश असतो. परंतु, अनेक पिकांची नोंद करण्यासाठी अद्ययावत आणि प्रभावी यंत्रणा नसल्याने, या सुविधांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास विलंब होतो. परिणामी, शासनाकडून मिळणारे अनुदान, विमा किंवा नुकसान भरपाई यांसारख्या महत्त्वपूर्ण लाभांपासून शेतकरी वंचित राहतात किंवा त्यांना उशिरा मिळतात.
आता डिजिटल क्रॉप सर्व्हे ऍप चा वापर कसा करायचा, त्या बद्दल जाणून घेऊ या :-
- मित्रांनो, डिजिटल क्रॉप सर्व्हे हे ऍप ई पीक पाहणी पीक पाहणी ॲप सारखेच आहे. किंबहुना हे ऍप ई पीक पाहणी पीक पाहणी ऍप चे नवीन व्हर्जन असून त्याला वापरणं देखील तितकंच सोपं आहे.
- हे ऍप वापरण्यासाठी तुम्हाला ते गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचे आहे. यासाठी तुम्हाला E-Peek Pahani ई-पीक पाहणी (DCS) असं सर्च करून ॲप डाऊनलोड करायचे आहे.
- त्यानंतर ऍप ओपन करून तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल, तिथे तुम्हाला तुमचं नाव, गावं सिलेक्ट करायचं आहे, मग तुम्हाला तुमच्या गटाचा नंबर टाकायचा आहे व पुढे तुमच्या पिकाची नोंदणी करण्याकरिता ऑप्शन येईल.
- पिकांची विचारलेली माहिती भरून आणि फोटो अपलोड करायचा आहे.
- आता ही सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायांचे आहे. ही माहिती डायरेक्ट राज्य शासनाकडे पोहचवून जाईल. अशा प्रकारे तुम्ही डिजिटल क्रॉप सर्व्हे ऍपचा वापर करून पिकांची नोंद करू शकता
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण ई पीक पाहणी पीक पाहणी करिता आता फक्त हे एकच ऍप- Digital crop survey 3.0 mobile app वापरले जाणारे असून आपण त्या बद्दल माहिती जाणून घेतली. मित्रांनो, हे ऍप शेतकरी सहज वापरू शकतात. या ऍप द्वारे शेतकऱ्यांना खरीप व रब्बी दोन्ही ही हंगामातील पिकांची नोंद करता येणार आहे. मित्रांनो, मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.