घरकुल योजना सर्वे लिस्ट डाउनलोड – तुमचे नाव यादीत तपासा (2 मिनितात) | Gharkul Survey List Download

नमस्कार मित्रांनो, आता घरकुल योजना सर्वे अंतर्गत यादीत नाव येणे चालू; तुमचे नाव यादीत आले का, ते कसे पहायचे? या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आत्ता सुरू असलेल्या प्रधानमंत्री घरकुल योजने अंतर्गत होत असलेल्या सर्वेचा परिणाम हळूहळू आपल्या समोर येत आहेत. या योजनेच्या अंतर्गत अनेक पात्र लाभार्थ्यांची नावे घरकुल यादी मध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. तुमच्या ही गावातील अनेक जणांची नावे या यादीत आली असतील. त्या नुसार तुमच्या गावात आज पर्यंत एकूण किती घरकुल मंजूर झाले आहेत याची यादी तुम्ही पोर्टल वर जाऊन पाहू शकता.

पण मित्रांनो, नुकत्याच झालेल्या सर्वे मधून जी नावे नव्याने घरकुल यादी मध्ये जोडली गेली आहेत, त्यांची माहिती कशी मिळवावी व तुमचे नाव यादीत आले का, ते कसे पहायचे? याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देणार आहोत. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

घरकुल योजना सर्वे लिस्ट पहा

मित्रांनो,नुकत्याच झालेल्या सर्वेतून नव्याने जी नावे जोडली गेली आहेत, त्यात आपले नाव कसे पहायचे? या बद्दल पुढे जाणून घेऊ या :-

स्टेप 1 : मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइट वर जायचे आहे. त्या नंतर होम पेज वर असलेल्या Awaassoft या ऑप्शन मधील Report पर्यायावर क्लिक करायचे आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकृत वेबसाइट => www.pmayg.nic.in

स्टेप 2: आता नेक्स्ट पेज वर थोडं खाली स्क्रोल केल्यावर Awas Plus Reports या ऑप्शन मध्ये तुम्हाला तीन पर्याय दिसतील. त्यातील तिसरा पर्याय Awas Plus Category-Wise Data Summary यावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 3 : आता या नंतर नेक्स्ट पेज वर डाव्या बाजूला दिलेल्या ऑप्शन मधून तुमचं राज्य, मग जिल्हा, तालुका, व गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे. व Submit बटन वर क्लिक करायचं आहे.

स्टेप 4 : मित्रांनो, आता तुमच्या समोर एक यादी ओपन होईल. यावेळी जी यादी तुमच्या समोर येते, त्यामध्ये आधीच्या घरकुलां सोबतच नुकत्याच नव्याने जोडलेली नावे देखील तुम्हाला दिसतील. त्यात तुमचं नाव आहे का ते तुम्ही पाहू शकता. तसेच घरकुल योजना लिस्ट तुम्ही PDF आणि एक्सेल मध्ये डाउनलोड करू शकता.

तर मित्रांनो, या पद्धतीने प्रत्येक व्यक्ती आपली स्थिती तपासू शकते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजून शेवटची यादी प्रदर्शित झालेली नाही त्यामुळे ही माहिती नियमित अपडेट होत राहणार आहे. त्यामुळे तुम्ही पोर्टल वर जाऊन वारंवार तपासणी करणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण घरकुल योजना सर्वे अंतर्गत यादीत नाव येणे चालू; तुमचे नाव यादीत आले का, ते कसे पहायचे या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.