
मित्रांनो महाराष्ट्र सरकार कडून शासन निर्णय म्हणजेच GR साठी नवीन वेबसाईट लाँच करण्यात आली आहे. यामध्ये दिलेल्या बारकोड वरून मोबाईल मध्ये तुम्ही GR ( शासन निर्णय) डाउनलोड करू शकता. आता हा शासन निर्णय बारकोड वरून मोबाईल मध्ये डाउनलोड कसा करायचा,या बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, ‘शासन निर्णय’ (GR) म्हणजे सरकारच्या विविध विभागांकडून दिले जाणारे अधिकृत आदेश किंवा धोरणात्मक निर्णय किंवा मार्गदर्शक सूचना असतात. हे निर्णय किंवा सूचना या सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी, तसेच निधीच्या वाटपासाठी किंवा अधिकारांच्या बदलासाठी किंवा नवीन धोरण राबवण्यासाठी महत्त्वाचे असतात. पूर्वी या निर्णयांची माहिती फक्त संबंधित कार्यालयातच उपलब्ध असायची,
मात्र आत्ताच्या डिजिटल युगातील आवश्यकतेनुसार प्रशासकीय प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक खास महत्वाचा उपक्रम हाती घेतला, तो उपक्रम म्हणजे “नवीन शासन निर्णय (GR Portal) पोर्टल”. या पोर्टलच्या माध्यमातून सामान्य नागरिक, शासकीय अधिकारी, संशोधक, पत्रकार आणि इतर संबंधित व्यक्ती शासनाच्या निर्णयांची अधिकृत माहिती सहजपणे मिळवू शकतात. यामुळे आता कोणत्याही नागरिकाला संबंधित कार्यालयाची धावपळ न करता आपल्या मोबाईल वरून हवी ती माहिती मिळवता येणार आहे. त्यासाठी फक्त शासन निर्णय वेबसाईट व त्यात समाविष्ट करण्यात आलेले बारकोड स्कॅन करून तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करायचा आहे.
नवीन शासन निर्णय (GR) बारकोड द्वारे डाउनलोड प्रक्रिया
स्टेप 1 : मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला GR च्या नवीन वेबसाईट https://gr.maharashtra.gov.in वर जायचे आहे.
वेबसाईट ओपन झाल्यावर नेक्स्ट इंटरफेस मध्ये तुम्हाला View Government Resolution/ शासन निर्णय पहा असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 2 : त्या नंतर पुढे तुम्हाला काही ऑप्शन दिसतील.
- Department Name/विभागाचे नाव :- या मध्ये तुम्हाला सरकारच्या विविध डिपार्टमेंट चे जीआर (GR) इथे शोधू शकता. म्हणजेच तुम्हाला ज्या डिपार्टमेंट चा GR हवा आहे, त्या डिपार्टमेंटला सिलेक्ट करून खाली दिलेला कॅपचा टाकायचा आहे व वेरीफाइ करून सर्च केल्यास तुम्हाला तट डिपार्टमेंट चे सर्व GR इथे दिसतील.
- Keyword: /महत्वाचा शब्द: – तसेच तुम्ही एखादा कीवर्ड म्हणजेच एखादा शब्द टाकून संबंधित GR बद्दल सर्व करून मिळवू शकता.

- From Date आणि To date /दिनांकापासून दिनांकापर्यंत:- या ऑप्शन द्वारे तुम्ही एखाद्या स्पेसिफिक तारखेचा GR मिळवू शकता.
- Unique code /सांकेतांक क्रमांक:- तसेच जर तुम्हाला एखादा युनिक कोड माहीत असेल तर तुम्ही तो टाकून GR पाहू शकता.

नंतर दिलेला कॅपचा टाकून Search /शोधा करायचे आहे.
स्टेप 3 : मित्रांनो, या नंतर खाली आल्यावर तुम्हाला शासनाचे सर्व GR दिसतील. त्यात तुम्हाला प्रत्येक GR चे title, डिपार्टमेंट चे नाव, तारीख, युनिक कोड, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तुम्हाला इथे क्यूआर कोड QR code किंवा बारकोड साग ऑप्शन देखील देण्यात आला आहे. या क्यूआर कोड वर स्कॅन करून तुम्ही पूर्ण GR पाहू शकता व त्याची पीडीएफ देखील डाउनलोड करू शकता. तसेच या क्यू आर कोड चा फोटो काढून तुम्ही तो इतरांना शेअर देखील करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण GR (शासन निर्णय) साठी आता बारकोड वरून मोबाईल मध्ये GR डाऊनलोड कसा करायचा, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.