नमस्कार मित्रांनो, सदर लेखांमध्ये आपण InstaMoney App Instant Personal Loan कसे घ्यायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण माहिती मध्ये आपण InstaMoney App Instant Personal Loan घेण्यासाठीची पात्रता काय आहे? त्याचबरोबर या पर्सनल लोनचा व्याजदर व परतफेड चा कालावधी किती आहे? सदरचे कर्ज घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते? सर्वात शेवटी महत्त्वाचे म्हणजे हे कर्ज मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया कशी करावी लागते? हे आपण विस्तृत स्वरूपात पाहणार आहोत.
InstaMoney Personal Loan App विषयी थोडक्यात…
InstaMoney हे एक मोबाईल ॲप आहे, ज्याचे संचालन Innoffin Solution Private Limited या कंपनी द्वारे केले InstaMoney हे RBI द्वारा नोंदणीकृत NBFC-P2P कंपनी InstaMoney App द्वारे अशा लोकांना वैयक्तिक कर्ज दिले जाते ज्यांना बँका किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे अवघड असते. अवघड यासाठी की, बँका व वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याची प्रक्रिया ही खूपच गुंतागुंतीची आणि किचकट असते. या प्रक्रियेमध्ये वेळेबरोबरच अनावश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. अशावेळी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून वेळेवर कर्ज मिळू शकत नाही, म्हणूनच InstaMoney App च्या माध्यमातून तात्काळ आणि सोप्या पद्धतीने कर्ज दिले जाते.
InstaMoney App Instant Personal Loan App व्याजदर आणि परतफेडीचा कालावधी
InstaMoney Instant Personal Loan चा व्याजदर 13% ते 36% प्रति वर्ष असतो. त्याचबरोबर सदरच्या कर्जाचा परतफेडीचा कालावधी 1 महिना ते 6 महिन्यापर्यंत InstaMoney Instant Personal Loan वर प्रोसेसिंग फी 1% ते 5% पर्यंत आकारली InstaMoney App सुरुवातीला 24 टक्के व्याजदरावर लोन ऑफर करत असते.
InstaMoney App Instant Personal Loan पात्रता
InstaMoney App वरून instant personal loan घेण्यासाठी तुम्हाला खालील अटी व शर्ती मध्ये पात्र होणे आवश्यक आहे. त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत हे खालीलप्रमाणे:
- InstaMoney App Instant Personal Loan साठी अर्ज करणारा अर्जदारा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय हे 18 ते 45 वर्षे यादरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणारा अर्जदार हा नोकरी करणारा किंवा स्वयंरोजगार असावा.
- अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे मासिक उत्पन्न हे 15,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदार नोकरी करत असेल तर त्याने मागील तीन महिन्याच्या पगाराच्या स्लिप्स् सादर करणे आवश्यक आहे.
- सदर कर्जासाठी अर्जदाराचा सिबिल स्कोर हा चांगला असणे आवश्यक आहे. खराब सिबिल स्कोर वर सदरचे कर्ज मिळत नाही.
- अर्ज करणारे व्यक्तीचे इतर कोणत्याही बँकेत काम वित्तीय संस्थेत कर्ज थकीत असल्यास त्याला कर्ज मिळत नाही.
InstaMoney App Instant Personal Loan आवश्यक कागदपत्रे
InstaMoney Instant Personal Loan साठी अर्जदारांनी काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. ती कागदपत्रे कोणती आहेत ते खालीलप्रमाणे:
- ओळखीच्या पुराव्यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स
- पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान ओळखपत्र, युटिलिटी बिले
- ई-मेल आयडी
- पासपोर्ट साईज फोटो किंवा मोबाईल सेल्फी स्वरूपातील फोटो
- अर्जदार व्यक्तीच्या मागील 3 महिन्याच्या सॅलरी स्लिप्स
- मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
InstaMoney App Instant Personal Loan अर्ज कसा करायचा?
InstaMoney App Instant Personal Loan घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया, जेणेकरून तुम्हाला सदरचा अर्ज भरताना कोणतीही अडचण येणार नाही.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये Google Play Store वर जाऊन InstaMoney App डाउनलोड करावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.innofinsolutions.instamoney
- InstaMoney App इन्स्टॉल केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा. त्यानंतर साइन अप करून विचारले जाणारे सर्व माहिती भरून तुमचे प्रोफाईल सेटअप करा.
- प्रोफाईल सेटअप झाल्यानंतर होम पेजवर जाऊन Personal Loan या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर आणि वैयक्तिक तपशील देऊन, सदर कर्जासाठी लागणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि e-KYC प्रक्रिया पूर्ण करा.
- वरील सर्व प्रक्रिया पूर्ण करून सर्वात शेवटी तुम्हाला Apply For Loan किंवा. Submit या बटनावर क्लिक करा.
अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची व दस्तऐवजांचे सत्यापन करून तात्काळ तुमच्या बँक खात्यामध्ये कर्जाची रक्कम जमा केली जाते.