Gas Cylinder E-KYC नमस्कार मित्रांनो, तुम्हाला देखील अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी एक महत्त्वपूर्ण गोष्ट करावी लागणार आहे ती म्हणजे आपल्याला गॅस एजन्सी मध्ये जाऊन इ केवायसी करून घ्यावी लागणार आहे. आणि मित्रांनो एक केवायसी केली तरच तुम्हाला तीन गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे. कारण की ज्यांनी ज्यांनी ई केवायसी केली नाही त्यांना या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही तसेच ज्या महिलांचा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज पात्र झालेला आहे त्या महिलांना इ केवायसी जरी केली नाही तरीसुद्धा अन्नपूर्णा योजनेचा म्हणजेच तीन गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे मोफत अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी पंतप्रधान उज्वला योजनेच्या व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी पात्र कुटुंबांना हे गॅस सिलेंडरचे अनुदान मिळणार आहे त्यासाठी त्यांनी गॅस एजन्सी मध्ये जाऊन संपर्क साधायचा आहे आणि बायोमेट्रिक केवायसी करून घ्यायची आहे. जसे की तुमचा एचपी गॅस सिलेंडर आहे तर तुम्ही एचपी गॅस एजन्सी मध्ये जायचं आहे किंवा आपला भारत गॅस सिलेंडर असेल तर भारत गॅस सिलेंडर ऑफिस मध्ये जाऊन बायोमेट्रिक केवायसी करून घ्यायची आहे.
आपल्याला स्वतः मोबाईल वरती केवायसी करायची असेल तर एच. पी. पे. एप्लीकेशन वरून सेल्फ केवायसी करता येईल. केवायसी ही एक मिनिटाची प्रोसेस आहे यसाठी आपल्याला फिंगरप्रिंट किंवा फेशियल व्हेरिफिकेशन द्वारे कम्प्लीट करता येणार आहे. ग्राहकांनी ऑनलाइन गॅस बुकिंग करावी लागणार आहे तसेच तीन गॅस सिलेंडरचे रक्कम लाभार्थ्यांना गॅस एजन्सी मार्फत मिळणार आहे. त्यासाठी ग्राहकांनी गॅस एजन्सी कडून गॅस सिलेंडर खरेदी केल्यानंतर तीन गॅस सिलेंडरचे रक्कम ग्राहकांच्या बँक अकाउंट मध्ये अनुदान स्वरूपात जमा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे जर गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.