तुमच्या गॅस सिलिंडरची मुदत संपली का? अशी चेक करा सिलेंडरची एक्सपायरी डेट | Gas Cylinder Expiry Date Check

Gas Cylinder Expiry Date Check : गॅस संपताच नव्या सिलिंडरसाठी ऑर्डर दिली जाते. कितीही घाईगडबड असली तरी लोक सिलिंडर कुठे लीक तर झालेला नाही ना याची खातरजमा करून घेतात. त्याचे वजन तपासले जाते परंतु सिलिंडरची एक्स्पायरी डेट तपासण्याच्या फंदात फारसे कुणी पडत नाही. परंतु हे धोक्याचे आहे. ही तारीख तपासून घेणे गरजेचे आहे.

जेव्हा आपण बाजारातून एखादी वस्तू खरेदी तेव्हा त्यावरील आधी एक्स्पायरी डेट तपासतो आणि वस्तू विकत घेतो. आरोग्याच्या दृष्टीने ही जागरुकता खूप गरजेचीसुद्धा आहे. यानंतरही बाजारात एक्स्पायरी डेट संपल्यानंतरही वस्तू विकल्या जातात. पण आपण त्यावर फारसं लक्ष देत नाहीत. यापैकीच एक वस्तू आहे gas cylinder expiry date check याचा आपल्या दररोजच्या आयुष्याशी संपर्क येत असते.

घरगुती सिलेंडरवर एक्स्पायरी डेट (gas cylinder expiry date check) लिहिलेली असते याची बहुतांश लोकांना काहीच कल्पना नसते. आपण सिलेंडर घेताना त्यामधील गॅस लीक होत नाही ना, याची तापासणी करतो. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याची एक्स्पायरी डेट चेक करत नाही. सध्या देशात बहुतांश लोकांच्या घरी घरगुती गॅस कनेक्शन आली आहेत. तरीही बऱ्याच लोकांना एलपीजी सिलेंडरवर  एक्स्पायरी डेट लिहिलेली असते हे माहित नसतं. याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया….

Gas Cylinder Expiry Date Check

कशी समजते सिलिंडरची एक्स्पायरी डेट ?

■ अक्षरे सिलिंडरच्या मुदतबाह्य होणारा महिना दर्शविते आणि अंकातून कोणत्या वर्षी मुदतबाह्य होणार हे दर्शवितात.

■ १२ महिन्यांची विभागणी चार गटांमध्ये करून त्यांना अनुक्रमे ए, बी, सी आणि डी अशी नावे दिली जातात.

Gas Cylinder Expiry Date Check यासाठी कुठे पाहायचे ?

  • सिलिंडर नीट निरखून पाहिला असाल तर त्यावर तीन पट्ट्या असतात. त्यावर ए- २३, बी-२४ किंवा सी-२५ असे नंबर लिहिलेले असतात. या क्रमांकांवरूनच
  • ए-२४ चा अर्थ असा आहे की सिलिंडर २०२४ या वर्षात जानेवारी ते मार्च दरम्यान एक्स्पायर होईल. डी-२७ चा अर्थ असा की सिलिंडर २०२७ मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मुदतबाह्य होईल.

ABCD या अक्षरांचा अर्थ : Gas Cylinder Expiry Date Check

कोणत्याही एलपीजी सिलेंडरवर ज्या तीन पट्ट्या असतात, त्यावर ठळक अक्षरामध्ये एक कोड लिहिलेला असतो. हा कोड म्हणजेच सिलेंडरची एक्स्पायरी डेट. हा कोड A-24, B-25, C-26 आणि D-27 असा असतो. या कोडमधील ABCD ही इंग्रजी अक्षरे महिना दर्शवतात, तर त्यामागील लिहिलेला क्रमांक कोणतं वर्ष आहे, याची माहिती देतात. आता या कोडवरुन सिलेंडरची एक्स्पायरी कशी समजते ते समजून घेऊया. याला या कोडमध्येच टेस्टिंग डेट दिलेली असते. यालाच Test Due Date असंही म्हणतात.

या महिन्यात होणार अयोग्य 

जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च
बीएप्रिल, मे आणि जून
सीजुलै ते सप्टेंबर
डीऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर

सिलिंडरचे लाइफ किती असते ?

  1. सामान्यपणे एका एलपीजी गॅस सिलेंडरची लाईफ 15 वर्षे  इतकी असते. वापरात असताना सिलिंडर दोनवेळा तपासणीसाठी पाठवला जात असतो. पहिली चाचणी 10 वर्षे तर दुसरी त्यानंतर 5 वर्षांनी केली जात असते.
  2. तपासणीवेळी सिलिंडरची हायड्रो टेस्ट केली जाते. पाच पट प्रेशरने तो टिकेल का हे तपासले जाते. चाचणीत अयोग्य आढळल्यास सिलिंडर नष्ट केला जातो.