गट नंबर टाकून तुमच्या जमिनीचा घरबसल्या नकाशा पहा
गट नंबर टाकून तुमच्या जमिनीचा घरबसल्या नकाशा पहा : नमस्कार शेतकरी मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्ट डिजिटल स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेती क्रांतीमध्ये सुद्धा फार मोठा आमुलाग्र बदल घडून आलेला आहे, शेत जमिनीचा नकाशा सध्या महाराष्ट्र शासनाने ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्याला शेतामधून जाण्यासाठी वाट पाहिजे असेल किंवा शेतीच्या संदर्भात काही वाद विवाद चालले असतील तर तुम्ही स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता, जमिनीच्या नकाशाचे तेव्हाच गरज पडते जेव्हा रस्ता किंवा आपल्या जमिनीचे हद्द आपल्याला पाहिजे असते तेव्हा या गोष्टींची गरज भासत असते.
आज आपण या लेखाच्या माध्यमातून आपल्या मोबाईलच्या साह्याने आपल्या जमिनीचा नकाशा कसा पाहायचा यासंदर्भात माहिती देणार आहोत.
मोबाईल मध्ये तुमच्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी प्रक्रिया खालीलप्रमणे
● तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून जमिनीचा ऑनलाईन नकाशा पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
● त्यानंतर आपल्यासमोर महा भुमिअभिलेख ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईट ओपन होईल.
● त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये सर्वप्रथम क्रोम सेटिंग मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड हा ऑन करायचा आहे.
● तुमच्या मोबाईलच्या डाव्या बाजूला कोपर्यात तीन रेषा दिसतील तिथे क्लिक करा.
● आता तुम्हाला राज्य निवडायचे आहे.
● त्यानंतर जिल्हा तालुका निवडायचा आहे.
● शेवटी आपले गाव निवडायचे आहे.
● आता तुमचा गट नंबर टाकून तुम्ही सर्च या बटणावर क्लिक करायचे आहे.
● पुढे तुम्हाला तुमच्या गावाचा नकाशा दिसेल त्यामध्ये तुम्ही तुमचा गट नंबर टाकून स्वतःच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता.
सारांश :-
शेतकरी मित्रांनो महाभुमिअभिलेख ही महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट असून या वेबसाईटच्या माध्यमातून आपण सहजरित्या मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या जमिनीचा नकाशा डिजिटल स्वरूपात पाहू शकतो, माहिती आवडली असल्यास आपण शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवावी.