
नमस्कार मित्रांनो, आज आपण मनरेगा जॉब कार्ड तयार कसे करायचे आणि आधीपासून असलेले कार्ड डाउनलोड कसे करायचे, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, मनरेगाकडून मिळालेले जॉब कार्ड हे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरते. मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मागणाऱ्या कुटुंबासाठी जॉब कार्ड दिले जाते, मग ते खेडे गावात असो किंवा शहरात रोजगार मागणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला जॉब कार्ड भेटत असते.
पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, जॉब कार्ड हे फक्त रोजगारसाठी कामात येत नाही, तर ते काही सरकारी योजना व सरकारी कामांसाठी देखील वापरले जाते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपले जॉब कार्ड काढून घेणे खूप गरजेचे आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर सध्या तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच घरकुल योजना 2025 महाराष्ट्र अंतर्गत फॉर्म भरायचा असेल, तर त्याचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला जॉब कार्ड नंबरची आवश्यकता असणार आहे.
त्याशिवाय तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म भरू शकणार नाहीत. यावरून तरी तुम्हाला समजलेच असेल की जॉब कार्ड सध्या किती महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही ही आत्ताच लवकरात लवकर जॉब कार्ड काढून घ्या. मित्रांनो, जॉब कार्ड कसे काढावे? ते ऑनलाईन काढायचे की ऑफलाईन? याची संपूर्ण माहिती आम्ही आजच्या लेखात दिली आहे. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा….
जॉब कार्ड डाउनलोड कसे करायचे ?
मित्रांनो, जर तुमचं आधीच जॉब कार्ड असेल तर तुम्ही डाउनलोड देखील करून घेऊ शकता. ते डाउनलोड कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप 1 : मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला https://nregastrep.nic.in या वेबसाईट वर जायचे आहे. त्या नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.

स्टेप 2 : नंतर ब्लॉक म्हणजेच तालुका निवडायचा आहे.

स्टेप 3 : त्या नंतर पुढे तुम्हाला तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे.

स्टेप 4 : आता नेक्स्ट पेज वर थोडं खाली यायचं आहे आणि Job Card/Registration या सेक्शन मध्ये तिसरा ऑप्शन ‘Job card /Employment Register’ दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.


स्टेप 5 : आता या नंतर नेक्स्ट पेज वर तुमच्या गावातील ग्रामपंचायतीतील सर्व जॉब कार्ड इथे दाखवले जातील. इथे तुमच्या नाव किंवा जॉब कार्ड नंबर शोधायचे आहे व त्यावर क्लिक करायचे आहे,

आणि तुमचे जॉब कार्ड ओपन होईल, तुम्ही ते कार्ड डाउनलोड करून सेव्ह करून घेऊ शकता.

जॉब कार्ड कसे काढावे ?
मित्रांनो, जॉब कार्ड काढताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं जॉब कार्ड हे ऑनलाईन पध्दतीने काढता येणार नाही. तर जॉब कार्ड हे फक्त ऑफलाईन पद्धतीने च काढता येतं. त्यासाठी तुम्ही ग्रामरोजगार सेवक किंवा ग्रामसेवक कडे जाऊ शकता. त्यांच्या मार्फतच तुमचं जॉब कार्ड काढता येईल. मित्रांनो, ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक कडून जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आधी एक फॉर्म म्हणजेच ज्याला नमुना 1 असे ही म्हणतात.

तो फॉर्म भरून द्यावा लागतो आणि त्या सोबत काही कागदपत्रे जोडावी लागतात. आणि त्या नंतर हा फॉर्म तुम्हाला ग्रामसेवक कडे जमा करून तुमचं जॉब कार्ड नंबर मिळवू शकता. मित्रांनो, जॉब कार्ड नंबर तुम्हाला लगेच सुद्धा मिळू शकते किंवा चार ते पाच दिवसांत देखील मिळू शकते.
कागदपत्रे कोण कोणती जोडायची आहेत ?
मित्रांनो, नमुना 1 चा फॉर्म सोबत तुम्हाला काही कागदपत्रे जोडावी लागतात जसे की, सर्वात पहिले तुम्हाला नमुना 1 चा फॉर्म भरायचा आहे. त्या नंतर
- कुटुंबातील 18 वय वरील सर्वांचे आधार कार्ड,
- रेशन कार्ड,
- बँक पासबुक ची झेरॉक्स,
- तसेच 46चा फॅमिली फोटो, इत्यादी कागदपत्रे जोडायची आहेत.
तर मित्रांनो, अश्या पद्धतीने तुम्ही तुमचं जॉब कार्ड काढू शकता. आणि जर आधीच काढलेलं असेल तर ते तुम्ही वरील प्रमाणे डाउनलोड देखील करू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण जॉब कार्ड कसे काढावे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.