लाडकी बहीण योजना तुमचा फॉर्म Approved झाला असेल किंवा Pending असेल तर लवकर ही 3 काम करुन घ्या ! तरच येणार हफ्ता

Ladki Bahin Yojana Form Approved : तुम्हीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल, तर ही माहिती व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत वाचा. काही बहिणींचे फॉर्म भरल्यानंतर शासनाकडून ॲप्रोव्ह करण्यात आले आहेत, तर काही बहिणीचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत महिलांनी काय करायला पाहिजे, याबाबतची सविस्तर माहिती आपण समजून घेऊयात.

Aadhaar Seeding

सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिलांचा अर्ज ऑनलाईन मंजूर झालेला असेल म्हणजेच नारीशक्ती दूत या ॲपवरती किंवा लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर तुमच्या अर्जाची स्थिती तपासल्यानंतर अर्ज Approved दाखवत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक असल्याची खात्री करून घ्यावी लागेल.

सरकारकडून महिलांना देण्यात येणारी लाभाची रक्कम डीबीटी प्रणालीद्वारेच वितरित केली जाणार असल्याने आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे.

Bank A/C Active Status

तुमचा जर फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक सुद्धा लिंक असेल, तरी तुमचा जर बँक खाते क्रमांक बऱ्याच दिवसापासून व्यवहार केलेला नसल्यामुळे इन ऍक्टिव्ह म्हणजेच बंद असेल किंवा खात फ्रिज झालेलं असेल, तरी तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेची रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या संबंधित बँकेत जाऊन खात सुरू असल्याची खात्री करून घ्या. खात बंद असल्यास खात्यामध्ये आवश्यक ते अपडेट करून खात्याची ई-केवायसी करा आणि तुमचा बंद पडलेला खाते क्रमांक ऍक्टिव्ह करून घ्या.

अर्ज Reject झाल्यास काय ?

महिलांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज भरण्यात आलेली असून बरेच अर्ज शासनाकडून काही कारणास्तव रद्द करण्यात आलेले आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार क्रमांक लिंक नसणे, अर्ज भरत असताना चुकीचा आधार क्रमांक टाकलेला असणे, यासोबतच चुकीची कागदपत्र अपलोड करणे या विविध कारणामुळे बहुतांश महिलांची अर्ज रद्द करण्यात आली आहेत.

अशा परिस्थितीत तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा अर्ज भरलेला असेल किंवा ज्या मोबाईलवरती भरलेला असेल त्या ठिकाणी तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल, तर त्याठिकाणी रिजेक्ट होण्याचं मुख्य कारण देण्यात आलेला असेल त्यानुसार तुमच्या अर्जामध्ये लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या.

अर्ज Pending असल्यास काय ?

ज्या महिलांनी आपला अर्ज केलेला आहे; परंतु अद्याप अर्जाची स्थिती Pending दाखवत असेल, तर अशा परिस्थितीत सध्या तुमच्या अर्जाची तपासणी सुरू आहे, असं तुम्ही समजू शकता. लवकरच तुमच्या अर्जाचा स्टेटस तुम्हाला बघायला मिळेल, यासाठी 3-4 दिवसाच्या अंतराने तुमच्या अर्जाची स्थिती तपासा.

तुमचा जर अर्ज मंजूर झालेला असेल तर तुम्हाला नक्की पैसे मिळतील, जर अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी असेल, तर तुम्हाला अर्ज Rejected दाखवलं, अशावेळी लवकरात लवकर तुमच्या अर्जाची दुरुस्ती करून परत अर्ज सबमिट करा.