मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हानिहाय लाभार्थी यादी

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या जिह्यानिहाय नवीन याद्या प्रकाशित व्हायला सुरुवात झालेली आहे. सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची जिल्हानिहाय पात्रता यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये तुमचे नाव आहे का ती यादी कशी डाउनलोड करायची या विषयी आपण या पोस्ट च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. १ जुलै पासून साधारणतः ३१ जुलैपर्यंत जवळपास एक कोटी एक्याऐंशी हजार महिलांचे माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज यशस्वीरित्या पूर्ण केलेले होते. आणि आता २५ ऑगस्ट पर्यंत २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० हून अधिक अर्ज राज्य सरकारला प्राप्त झालेले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी आतापर्यंत आपला अर्ज पूर्ण केला आहे अशा पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पहिला हप्ता १४ ऑगस्ट नंतर रक्षाबंधनाच्या वेळेस जमा करण्यात आलेला होता आणि आता दुसरा हप्ता म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता ३१ ऑगस्ट रोजी जमा होणार असल्याची अधिकृत माहित राज्य सरकारने दिलेली आहे . त्या अनुषंगाने पात्र महिलांची जिल्हानिहाय यादी खाली दिलेली आहे.

तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून तुमच्या जिल्ह्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी आली आत्ताच करा डाउनलोड.

माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी यादी आली आत्ताच करा डाउनलोड