माझी लाडकी बहीण योजना व फ्री मोबाईल यादी Download करा, यादीत तुमचे नाव तपासा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यादी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलैपासूनच अर्जप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत बऱ्यापैकी अर्जदारांनी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरलेले आहेत. ज्या लोकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केले असतील त्यांच्या पात्रता याद्या २९ जुलैपासूनच आल्या होत्या. तर या पोस्ट च्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी तुमच्या सर्व समस्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यामध्ये मोफत मोबाईल कसा मिळवायचा, लाभार्थी यादी कशी डाउनलोड करायची आणि त्यात आपले नाव कसे चेक करायचे, अर्ज केला आहे परंतु पैसे आले नाहीत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.

सर्व महिलांना दिवाळीआधी मिळणार ७,५०० – माझी लाडकी बहिण योजना

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना मिळणार ७,५०० रुपये : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महाराष्ट्र राज्यातील महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ जुलै २०२४ पासून अर्ज सुरु झालेत आणि हि अर्जप्रक्रिया आता ३0 सप्टेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली होती.

नुकतेच राज्य सरकारने जाहीर केले आहे कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व हप्त्यांचा लाभ महिलांना मिळणार आहे, जरी त्यांनी अर्ज लवकर केला तरी आणि जरी अर्ज उशिरा केला तरी. परंतु ज्या महिलांचा अर्ज पूर्ण झालेला असेल आणि पात्र झालेला असेल अशा महिलांना रक्षाबंधांपासूनच म्हणजे १४ ऑगस्ट पासून लाभहस्तांतरण करण्यास सुरुवात झालेली आहे.

त्यामुळे तुम्हाला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांचे हप्ते मिळाले असतील आणि आता ऑक्टोबर व नोव्हेंबर च्या हप्ता मिळाला असेल. म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण ७,५०० रुपये एवढे पैसे मिळाले असतील. पण जर तुम्हाला आतापर्यंत एकही हप्त्याचे पैसे मिळाले नसतील किंवा काही हप्त्याचे पैसे मिळाले असतील आणि जर तुम्ही आता पात्र असाल किंवा तुमचे नाव पात्रता यादीत असेल तर तुम्हला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे मिळून एकूण ४,५०० व ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे मिळून ३,००० रुपये रुपये थेट तुमच्या खात्यावरती जमा होतील.

फ्री मोबाईल योजना – मोफत मोबाईल साठी अर्ज आणि लाभार्थी यादी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महाराष्ट्र राज्यातील महिलांना दर महिन्याला १,५०० रुपये इतकी रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करत आहे.
नुकतेच राज्य सरकारने जाहीर केले आहे कि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व हप्त्यांचा लाभ महिलांना मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण ७,५०० रुपये एवढे पैसे मिळणार आहेत.

राज्य शासनाकडून दिवाळीच्या बाबतीत अतिशय मोठी खुशखबर समोर आली आहे ती म्हणजे माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या हप्त्यासोबतच राज्यातील काही महिलांना मोबाईल देखील मिळणार आहे. आता कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे तुम्ही कसा नंबर लावायचा आहे, अर्जप्रक्रिया काय आहे आणि अर्ज कुठे करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती खालील लिंक वर क्लिक करून मिळावा आणि योजनेचा त्वरित लाभ मिळवा कारण हि योजना कमी महिलांसाठी आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी

राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची पात्र यादी जाहीर केली आहे. आतापर्यंत जवळपास २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० महिलांचे माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. या योजनेअंतर्गत पहिला आणि दुसरा हप्ता १४ ऑगस्ट च्या नंतर म्हणजेच रक्षाबंधनाच्या वेळेस जमा केला गेला होता ज्यामध्ये महिलांना ३,००० रुपये जमा झाले होते आणि त्यानंतर तिसरा हप्ता म्हणजेच सप्टेंबर महिन्याचा हप्ता सप्टेंबर च्या शेवटच्या वीक मध्ये जमा केला गेला होता, आणि आता जमा होणारा हप्ता म्हणजेच चौथा आणि पाचवा हप्ता ऑक्टोबर मध्ये जमा करायला सुरु आहे. त्या अनुषंगाने पात्र महिलांची यादी कुठे पाहता येणार याबद्दलची माहिती खाली दिले आहे, ते वाचून घ्या.

तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून तुमच्या जिल्ह्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्रता यादी Download करा.