Government Services

मतदान कार्ड काढा ऑनलाईन फ्री मध्ये | New Voter ID Card Apply Online

भारत सरकारने डिजिटल अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शासन सर्व प्रकारच्या शासकीय सेवा डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देत आहे. या मध्ये राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलचा हि सहभाग आहे. या पोर्टलद्वारे, तुम्ही मतदान ओळखपत्रांसाठी अर्ज करू शकता. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला मतदान ओळखपत्र ऑनलाइन अर्ज करण्यासंबंधी सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत जसे की Voter ID ऑनलाइन अर्ज करणे म्हणजे काय, त्याचे फायदे, पात्रता, निकष, आवश्यक कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया इ.

निवडणुकीत मतदान करण्यासाठी नागरिकाला मतदान ओळखपत्र आवश्यक असते. 18 वर्षे पूर्ण झालेले भारतातील सर्व नागरिक मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. यासाठी केंद्र सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलद्वारे, सर्व पात्र नागरिक मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. ज्या लोकांनी अद्याप मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी केलेली नाही ते सर्व लोक भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

मतदान ओळखपत्रासाठी नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल आणि मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. यामुळे बराच वेळ आणि पैसा वाचेल.

मतदान ओळखपत्रासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

Voter ID Eligibility Criteria & Required Documents

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • हायस्कूल मार्कशीट
  • पत्त्यासाठी पुरावा
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे

मतदान ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया

ही प्रक्रिया फक्त प्रथमच मतदार कार्ड नोंदणीसाठी आहे, जर तुमच्याकडे आधीपासून मतदार ओळखपत्र असेल तर तुम्ही इथे अर्ज करू नये

स्टेप १: सर्वप्रथम राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर www.nvsp.in जा, आणि Voter Portal वर क्लिक करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 1

स्टेप २: आता तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल, तुम्हाला Create an Account वर क्लिक करायचे आहे.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 2

स्टेप ३: आता तुम्हाला एका नवीन पेजवर रीडायरेक्ट केले जाईल जिथे तुम्हाला नवीन वापरकर्ता म्हणून खाते नोंदणी करायची आहे, फॉर्म मध्ये तुमचा ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर टाका.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 3

स्टेप ४: आता नवीन पेज वर Send OTP बटन वर क्लिक करून, मोबाइल वर आलेला OTP खालच्या बॉक्स मध्ये टाईप करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 4

स्टेप ५: आता तुम्हाला तुमच्या वोटर आयडी पोर्टलचा पासवर्ड सेट करायचा आहे आणि खाली दिलेला कॅप्चा टाईप करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 5

स्टेप ६: आता तुम्हाला वोटर आयडी पोर्टलवर स्वागत असलेला मेसेज येईल

नोंद: भविष्यात वोटर आयडी पोर्टलवर लॉगिनसाठी, तुमचा मोबाइल नंबर आणि वरती तयार केलेला पासवर्ड वापरा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 6

स्टेप ७: तुमची बेसिक माहिती टाईप करा.

  1. नाव
  2. आडनाव
  3. राज्य
  4. लिंग
New Voter ID Card Apply Online Marathi Step 7

स्टेप ८: आता नवीन पेजवर, नवीन मतदार कार्ड नोंदणी करण्यासाठी New Voter Registration वर क्लिक करा

New Voter ID Card Apply Online Marathi Step 8

स्टेप ९: तुम्हाला नवीन पेज वर, नवीन मतदार कार्ड नोंदणीसाठी काही माहिती दिली जाईल. खाली असेलेल्या Let’s Start बटन वर क्लिक करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 9

स्टेप १०: प्रश्न (Are you applying for the Voter ID first time ? / तुम्ही पहिल्यांदाच मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करत आहात ?)

उत्तर: आता तुमच्या समोर दोन पर्याय येतील, त्यातील (Yes, I applying for the first time / होय, मी प्रथमच अर्ज करत आहे) बॉक्स वर टिक करून Save & Continue बटन वर क्लिक करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 10

स्टेप ११: प्रश्न (Are you citizen of India ? / तुम्ही भारताचे नागरिक आहात का?)

उत्तर: आता तुमच्या समोर दोन पर्याय येतील, त्यातील (Yes, I am an Indian Citizen, residing in India / होय, मी एक भारतीय नागरिक आहे, भारतात राहतो)

New Voter ID Card Apply Online Marathi Step 11

स्टेप १२: या स्टेप मध्ये वय आणि जन्मदिनांक तपासणी असणार आहे त्यासाठी काही डॉक्युमेंटसची गरज आहे. यासाठी खाली दिलेल्या कोणत्याही डॉक्युमेंट पैकी, कोणतेही एक स्कॅन (किंवा क्लिअर फोटो काढून) करून खालच्या बटनला (Upload) क्लिक करून अपलोड करा.

आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट, मार्कशीट ज्यावर जन्मतारीख आहे अशी इयत्ता १० / इयत्ता ८ / इयत्ता ५, जन्म प्रमाणपत्र

नोंद: जर आपले वय २१ वर्षपेक्षा जास्त असेल तर खाली असलेल्या Age Declaration फॉर्म डाउनलोड करून, प्रिंट काढून पूर्ण फॉर्म हाताने लिहून परत स्कॅन करून अपलोड करावे.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 12

स्टेप १३: आता मतदान ओळखपत्रावर जे काही छापून येणार आहे त्याची माहिती तुम्हाला भरायची आहे जसे पासपोर्ट साईझ फोटो, पूर्ण नाव, दिव्यांग असेल तर, इत्यादी.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 13

स्टेप १४: आता तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीची माहिती द्यायची आहे, ज्या व्यक्तीकडे आधीपासून मतदान ओळखपत्र आहे त्याची.

  1. वोटर आयडी
  2. नाव
  3. आडनाव
  4. आणि शेवट त्या व्यक्तीसोबत असलेले तुमचे नाते सिलेक्ट करा

आणि Save & Continue बटन वर क्लिक करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 14

स्टेप १५: आता शेवटची स्टेप म्हणजे ऍड्रेस तपासणी या मध्ये टाकायची माहिती अशी

१) घराचा नंबर २) भाषा ३) पत्ता ४) पोस्ट ऑफिस ५) गाव ६) क्षेत्र प्रकार ७) पिन कोड, या नंतर तुमचा मतदारसंघ निवडा

New Voter ID Card Apply Online Marathi Step 15

स्टेप १६: आता ऍड्रेस तपासणीसाठी काही डॉक्युमेंटसची गरज आहे. यासाठी खाली दिलेल्या कोणतेही एक स्कॅन (किंवा क्लिअर फोटो काढून) करून खालच्या बटनला (Upload) क्लिक करून अपलोड करा.

बँक पासबुक, रेशन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, भारताचा पासपोर्ट, भाडे करार, सध्याचे पाणी/लाईट/गॅस/फोन बिल इत्यादी

New Voter ID Card Apply Online Marathi Step 16

स्टेप १७: आता शेवट Declaration चा भाग आहे, यामध्ये तुम्ही वरती दिलेल्या पत्यावर तुम्ही कधीपासून राहता ते सिलेक्ट करा वर्ष / महिने. तुमचे सध्याचे ठिकाण आणि नाव टाकून Save & Continue बटनावर क्लिक करा.

New Voter ID Card Apply Online Marathi Step 17

आता तुम्ही दिलेल्या सर्व माहितीचा एक फॉर्म तुमच्यासमोर येईल, तुम्ही तो पूर्ण चेक करा काही चुकीचे असल्यास Edit Form वर क्लिक करून तुम्ही चूक सुधारू शकता, जर पूर्ण फॉर्म बरोबर असेल तर Submit बटनावर क्लिक करा. आणि शेवट नवीन पेज वर, तुमचा फॉर्म यशस्वीरित्या नोंदणीकृत झाल्याचा मेसेज येईल.

अशा पद्धतीने तुम्ही नवीन Voter ID साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर साधारण १५ दिवसामध्ये कागदपत्रे तपासणी होईल आणि मतदान कार्ड तयार झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाइल वर येईल, तुम्ही त्याच डॅशबोर्ड वर कार्ड तयार झाल्यानंतर त्याची डिजिटल कॉपी डाउनलोड करू शकता.

Related Posts

सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये) | 7/12 Online Download

नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑनलाईन पद्धतीने फ्री मध्ये सातबारा कसा बघायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या उताऱ्यावर कोणाकडे किती जमीन आहे, कोणाच्या मालकीची...

Complete Guide to Online PAN Card Application 2024

A PAN (Permanent Account Number) Card is essential for filing Income Tax Returns in India. It’s crucial to ensure that all information on the card is up-to-date and accurate. This article will guide you through the steps to update or...

ESIC कार्ड डाउनलोड करा Free मध्ये मोबाईल वर | Download ESIC e Pehchan Card

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर ESIC मेंबर असाल म्हणजेच तुम्ही जर ESIC योजनेत सामील असाल तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ESIC कार्ड मिळते आणि या कार्डच्या मदतीने तुम्ही ESIC दवाखान्यात किंवा हॉस्पिटल मध्ये कोणताही खर्च न करता कोणत्याही आजारावर उपचार करू...

शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर किती धान्य मिळते, Free मध्ये चेक करा | How to Check Ration Card Details Online

नमस्कार मित्रांनो, आज आपण शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर तुम्हाला किती धान्य मिळायला पाहिजे, व दुकानदार किती धान्य देतो, याचा तपशील ऑनलाईन चेक कसे करायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमचे रेशन कार्ड हे तुमच्या ओळखीचा पुरावा...

How to Apply for Driving License Online 2024

A driving license, often referred to as a driver’s license, is a crucial document that permits an individual to operate a motor vehicle legally. It serves as both an identification and authorization to drive, granted after the successful completion of...

How to Update Aadhaar Card Online 2024

Aadhaar Card Update Process : The Aadhaar Card is required for any government scheme or booking train tickets. Many people have not yet updated their Aadhaar card, so in this situation, UIDAI is providing the facility to update the Aadhaar...

Ayushman Card Download 2024

क्या आपके पास आयुष्मान कार्ड है ? The Ayushman Bharat Scheme, also known as the Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY), is a government healthcare program in India launched by the Government of India in September 2018. The primary goal...

पैन कार्ड के लिए ऑनलाइन आवेदन करने की पूरी जानकारी 2024

आयकर विभाग ने पैन कार्ड के ऑनलाइन आवेदन के लिए मुख्य रूप से प्रोटीन ईगॉव टेक्नोलॉजीज लिमिटेड (पूर्व में एनएसडीएल) को काम सौंपा है। इसके अलावा पैन कार्ड के आवेदन के लिए आईटी विभाग द्वारा यूटीआई इंफ्रास्ट्रक्चर एंड सर्विसेज लिमिटेड...

How to Apply for Labour Card Online 2024

India, ranking second in global population, has approximately 500 million workers employed as laborers and on contractual basis across diverse sectors including agriculture, construction, and various industries. The Ministry of Labour and Employment, one of the longest-standing and most crucial...

गाडीवर असलेला E-Challan फाइन ऑनलाईन कसा भरावा | फाइन ऑनलाईन कसा चेक करावा | Traffic E-Challan Maharashtra

नमस्कार मिञांनो, तुम्ही दुचाकी किंवा चारचाकी गाडी चालवत असताना तुमच्याकडून कळत नकळत चुका होत असतात, जसे कि सिग्नल तोडला जाणे, हेल्मेट न वापरणे, ओव्हर स्पीडींग, नो पार्किंग मध्ये पार्किंग करणे इत्यादी. तर अश्या अनेक कारणांमुळे तुम्हाला महाराष्ट्र ट्रॅफिक पोलिसांकडून दंड...