
नमस्कार मित्रांनो, प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मिळकत पत्रिका किंवा मालमत्ता पत्रक. महाराष्ट्र सरकारनं आता प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन फ्री मध्ये उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्यालयात जायची गरज नाहीये. तुम्ही घरबसल्या मोबाईलवर ते काढू शकता. ते कसं काढायचं, या बद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, ज्या प्रकारे आपल्या सातबारा उताऱ्यावर आपल्या शेत जमिनी संबंधित सर्व माहिती असते, त्याच प्रमाणे एखादया व्यक्तीच्या नावावर किती बिगर शेतजमीन आहे याची माहिती देखील आपल्याला मिळू शकते. त्यासाठी सरकारने स्वामित्व योजना आणली होती. या योजने अंतर्गत नागरिकांना त्यांच्या जमिनीचे व घरांचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात येत आहेत. प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच मालमत्ता पत्रक, किंवा मिळकत पत्रिका. म्हणजेच बिगर शेत जमीन असलेल्या ठिकाणी व्यक्तीच्या नावावर किती मालमत्ता आहे याची माहिती त्यात नमूद केलेली असते.
प्रॉपर्टी कार्ड वर त्या व्यक्तीचे घर, बंगला, व्यवसायाची इमारत इत्यादी स्थावर मालमत्तेची माहिती लिहिलेली असते. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी आता तुम्हाला सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही तर तुम्ही घरबसल्या मोबाईल वरच ते ऑनलाईन पद्धतीने काढू शकता. तसेच, हे प्रॉपर्टी कार्ड तुम्ही ऑनलाईन फ्री मध्ये पाहू शकता फक्त कोणत्याही शासकीय बाबींसाठी तुम्ही हा उतारा वापरू शकत नाही. हे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन कसे बघायचे ते जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन कसे काढायचे
स्टेप 1 : मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला महाभूमिलेख च्या ऑफिशियल वेबसाईट www.mahabhumi.gov.in या वर जायचे आहे.
स्टेप 2 : वेबसाईट ओपन झाल्यावर तुमच्या समोर एक नवीन टॅब ओपन होईल. त्यात तुम्हाला बिगर शेतजमीन /घर बद्दल तपशील बघायचे असतील तर त्यासाठी उजव्या बाजूला स्कॉल करून दिलेली माहिती टाकायची आहे. ज्यात तुम्हाला तुमचा विभाग टाकयचा आहे व नंतर Go ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.
प्रमुख विभाग – अमरावती, औरंगाबाद, कोंकण, नागपूर, नाशिक, पुणे. तुम्ही तुमच्या जवळचा प्रमुख विभाग निवडा.

स्टेप 3 : आता नेक्स्ट पेज वर तुम्हाला तुमच्या विभागाचे नाव आलेले दिसेल. व त्या खाली ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक असे तीन ऑप्शन दिसतील. त्यात ‘मालमत्ता पत्रक’ ऑप्शन वर क्लिक करून जिल्हा व नंतर तालुका /न.भु.का. निवडायचा आहे. व त्यानंतर बिगर शेतजमीन किंवा घर ज्या गावात आहे ते गाव /गावपेठ निवडा.

स्टेप 4 : आता त्या नंतर तुम्हाला सिटी सर्वे नंबर (CTS No) /न. भु.क्र टाकायचा आहे. (मित्रांनो, तुम्हाला जर तुमचा CTS नंबर तुम्ही तुमचे पहिले नाव, आडनाव टाकू शकता.) व नंतर ‘नाव शोधा’ या बटन वर क्लिक करायचे आहे.
समजा तुम्ही आडनाव टाकून बटन क्लिक केले असेल तर खाली तुम्हाला तुमच्या गावातील त्याच आडनाव च्या लोकांची यादी दिसेल. तुम्ही त्यातील तुमचे नाव शोधून क्लिक करा

स्टेप 5 : या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे व ‘मालमत्ता पत्रक पहा’ या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

स्टेप 6 : त्या नंतर पुढे तुम्हाला दिलेला कॅपचा टाकायचा आहे. व verify ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
स्टेप 7 : मित्रांनो, आता पुढच्या पेज वर तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड म्हणजेच तुमचे मालमत्ता पत्रक/सिटी सर्वे उतारा आलेले दिसेल.

प्रॉपर्टी कार्ड कसे वाचायचे ?
मित्रांनो, सर्वात वरती तुम्हाला गावचे नाव, तालुका आणि जिल्हाचे नाव याची माहिती दिलेली आहे. त्या नंतर नगर भूमापन क्रमांक/ सिटी सर्वे नंबर व त्याचे क्षेत्र किती आहे ते दिलेले आहे. त्या नंतर सदर जागा किंवा प्लॉट कुणाच्या नावावर आहे त्याची माहिती दिलेली असते. त्या नंतर सर्वात खाली महत्त्वाची सूचना दिलेली असते.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे कोणाला एक रुपया ही न देता तुम्ही तुमचे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन पद्धतीने काढून पाहू शकता, मित्रांनो,मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.