Ladki Bahin Yojana 3rd Approval List : लाडकी बहिन योजनेच्या 3 टप्प्याची मंजूर यादी जाहीर,चेक करा पात्र यादीत नाव, पहा संपूर्ण माहिती

Ladki Bahin Yojana 3rd Approval List : महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना अर्थसहाय्य करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार राज्यातील पात्र महिलांना 1500 हजार रुपये प्रति महिना देत आहे महाराष्ट्र सरकारकडे या योजनेसाठी दोन कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यापैकी एक कोटी पेक्षा अधिक महिलांना या योजने अंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये सरकारने जमा केलेले आहेत.

परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे काही कारणास्तव रद्द करण्यात आलेले होते आणि त्या महिलांनी अर्जाची त्रुटी दुरुस्त करून तो अर्ज परत सादर केलेला आहे व त्याचप्रमाणे ज्या महिलांची अर्ज मंजूर आहे परंतु त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही व तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये या योजनेसाठी अर्ज सादर केला आहे अशा महिलांना योजनेचे लाभ कधी मिळणार असा प्रश्न महिलांना निर्माण होत आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्याची पात्र यादी ( Ladki Bahin Yojana 3rd Approval List ) जाहीर केलेली आहे तर कोणकोणत्या महिलांना या सप्टेंबर महिन्यामध्ये जमा होणाऱ्या टप्प्यात पैसा मिळणार आहे या संदर्भात सर्व माहिती आपण पुढे पाहूया.

लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा 1 जुलै 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीमध्ये ज्या महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केल्या होते आणि त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते अशा सर्व महिलांना 14, 15 आणि 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यामध्ये सरकारने जमा केलेले आहेत.

लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा

लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा 24 ऑगस्ट 2024 या पर्यंत ज्या महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा सर्व महिलांना 29, 30 आणि 31 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आलेली आहे.

असे चेक करा पात्र यादीत नाव

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा महाराष्ट्र सरकार सप्टेंबर महिन्यामध्ये लाखो महिलांच्या खात्यात जमा करणार आहे परंतु सरकार कडून मंजूर यादी ( Ladki Bahin Yojana 3rd Approval List) कशाप्रकारे तयार केले जाते त्या यादीमध्ये आपले नाव आहे का नाही हे कशाप्रकारे पाहता येईल जेणेकरून या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला लाभ मिळेल

ह्या संदर्भात सविस्तर माहिती मिळाली असता ज्या महिलांनी ऑनलाइन अर्ज 31 ऑगस्ट 2024 पर्यंत केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा सर्व महिलांना या योजनेचा तिसरा टप्पा मिळणार आहे

ह्याच महिलांना मिळतील 4500 हजार रुपये

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर केलेले होते आणि त्यांचे अर्ज महाराष्ट्र सरकारकडून मंजूर पण करण्यात आलेले आहे परंतु काय कारणास्तव त्यांना या योजनेचा पैसा मिळालेला नाही अशा सर्व महिलांना 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीमध्ये तिसऱ्या टप्प्यात 4500 हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana 3rd Approval List