Government Services

जॉब कार्डसाठी अर्ज कसा करावा ? | Job Card : Application Process, Download & Required Documents

नमस्कार मित्रांनो, आज आपण मनरेगा जॉब कार्ड तयार कसे करायचे आणि आधीपासून असलेले कार्ड डाउनलोड कसे करायचे, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, मनरेगाकडून मिळालेले जॉब कार्ड हे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरते. मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मागणाऱ्या कुटुंबासाठी जॉब कार्ड दिले जाते, मग ते खेडे गावात असो किंवा शहरात रोजगार मागणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला जॉब कार्ड भेटत असते.

पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, जॉब कार्ड हे फक्त रोजगारसाठी कामात येत नाही, तर ते काही सरकारी योजना व सरकारी कामांसाठी देखील वापरले जाते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपले जॉब कार्ड काढून घेणे खूप गरजेचे आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर सध्या तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच घरकुल योजना 2025 महाराष्ट्र अंतर्गत फॉर्म भरायचा असेल, तर त्याचा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला जॉब कार्ड नंबरची आवश्यकता असणार आहे.

त्याशिवाय तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म भरू शकणार नाहीत. यावरून तरी तुम्हाला समजलेच असेल की जॉब कार्ड सध्या किती महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही ही आत्ताच लवकरात लवकर जॉब कार्ड काढून घ्या. मित्रांनो, जॉब कार्ड कसे काढावे? ते ऑनलाईन काढायचे की ऑफलाईन ? याची संपूर्ण माहिती आम्ही आजच्या लेखात दिली आहे. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा….

जॉब कार्ड डाउनलोड कसे करायचे ?

मित्रांनो, जर तुमचं आधीच जॉब कार्ड असेल तर तुम्ही डाउनलोड देखील करून घेऊ शकता. ते डाउनलोड कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1 : मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला https://nregastrep.nic.in या वेबसाईट वर जायचे आहे. त्या नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे.

स्टेप 2 : नंतर ब्लॉक म्हणजेच तालुका निवडायचा आहे.

स्टेप 3 : त्या नंतर पुढे तुम्हाला तुमची ग्रामपंचायत निवडायची आहे.

स्टेप 4 : आता नेक्स्ट पेज वर थोडं खाली यायचं आहे आणि Job Card/Registration या सेक्शन मध्ये तिसरा ऑप्शन ‘Job card /Employment Register’ दिसेल, त्यावर क्लिक करायचे आहे.

स्टेप 5 : आता या नंतर नेक्स्ट पेज वर तुमच्या गावातील ग्रामपंचायतीतील सर्व जॉब कार्ड इथे दाखवले जातील. इथे तुमच्या नाव किंवा जॉब कार्ड नंबर शोधायचे आहे व त्यावर क्लिक करायचे आहे,

Job Card Download Step 5

आणि तुमचे जॉब कार्ड ओपन होईल, तुम्ही ते कार्ड डाउनलोड करून सेव्ह करून घेऊ शकता.

Job Card Download Step 6

जॉब कार्ड कसे काढावे ?

मित्रांनो, जॉब कार्ड काढताना एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचं जॉब कार्ड हे ऑनलाईन पध्दतीने काढता येणार नाही. तर जॉब कार्ड हे फक्त ऑफलाईन पद्धतीने च काढता येतं. त्यासाठी तुम्ही ग्रामरोजगार सेवक किंवा ग्रामसेवक कडे जाऊ शकता. त्यांच्या मार्फतच तुमचं जॉब कार्ड काढता येईल. मित्रांनो, ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक कडून जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आधी एक फॉर्म म्हणजेच ज्याला नमुना 1 असे ही म्हणतात.

तो फॉर्म भरून द्यावा लागतो आणि त्या सोबत काही कागदपत्रे जोडावी लागतात. आणि त्या नंतर हा फॉर्म तुम्हाला ग्रामसेवक कडे जमा करून तुमचं जॉब कार्ड नंबर मिळवू शकता. मित्रांनो, जॉब कार्ड नंबर तुम्हाला लगेच सुद्धा मिळू शकते किंवा चार ते पाच दिवसांत देखील मिळू शकते.

कागदपत्रे कोण कोणती जोडायची आहेत ?

मित्रांनो, नमुना 1 चा फॉर्म सोबत तुम्हाला काही कागदपत्रे जोडावी लागतात जसे की, सर्वात पहिले तुम्हाला नमुना 1 चा फॉर्म भरायचा आहे. त्या नंतर

  • कुटुंबातील 18 वय वरील सर्वांचे आधार कार्ड,
  • रेशन कार्ड,
  • बँक पासबुक ची झेरॉक्स,
  • तसेच 46चा फॅमिली फोटो, इत्यादी कागदपत्रे जोडायची आहेत.

तर मित्रांनो, अश्या पद्धतीने तुम्ही तुमचं जॉब कार्ड काढू शकता. आणि जर आधीच काढलेलं असेल तर ते तुम्ही वरील प्रमाणे डाउनलोड देखील करू शकता.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण जॉब कार्ड कसे काढावे, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा. धन्यवादl

Related Posts

8वां वेतन आयोग सैलरी कैलकुलेटर 2026 | 8th CPC Salary Calculator, Pay Matrix, Fitment Factor, DA, HRA

8वां वेतन आयोग क्या है ? भारत सरकार हर 10 साल पर एक वेतन आयोग (Pay Commission) बनाती है जो केंद्र सरकार के लगभग 49 लाख कर्मचारियों और 68 लाख पेंशनर्स की सैलरी और पेंशन की समीक्षा करता है। 7वां वेतन आयोग...

सातबारा (7/12) ऑनलाईन डाउनलोड करा (Free मध्ये) | 7/12 Online Download

नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑनलाईन पद्धतीने फ्री मध्ये सातबारा कसा बघायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्याकडे सातबारा उतारा असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण या उताऱ्यावर कोणाकडे किती...

Complete Guide to Online PAN Card Application 2024

A PAN (Permanent Account Number) Card is essential for filing Income Tax Returns in India. It’s crucial to ensure that all information on the card is up-to-date and accurate. This article will guide you through the...

ESIC कार्ड डाउनलोड करा Free मध्ये मोबाईल वर | Download ESIC e Pehchan Card

नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर ESIC मेंबर असाल म्हणजेच तुम्ही जर ESIC योजनेत सामील असाल तर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला ESIC कार्ड मिळते आणि या कार्डच्या मदतीने तुम्ही ESIC दवाखान्यात किंवा हॉस्पिटल मध्ये कोणताही खर्च न करता...

शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर किती धान्य मिळते, Free मध्ये चेक करा | How to Check Ration Card Details Online

नमस्कार मित्रांनो, आज आपण शासन नियमाप्रमाणे रेशन कार्ड वर तुम्हाला किती धान्य मिळायला पाहिजे, व दुकानदार किती धान्य देतो, याचा तपशील ऑनलाईन चेक कसे करायचा, याबद्दल सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमचे रेशन कार्ड...

How to Apply for Driving License Online 2024

A driving license, often referred to as a driver’s license, is a crucial document that permits an individual to operate a motor vehicle legally. It serves as both an identification and authorization to drive, granted after...

How to Update Aadhaar Card Online 2024

Aadhaar Card Update Process : The Aadhaar Card is required for any government scheme or booking train tickets. Many people have not yet updated their Aadhaar card, so in this situation, UIDAI is providing the facility...

Ayushman Card Download 2024

क्या आपके पास आयुष्मान कार्ड है ? The Ayushman Bharat Scheme, also known as the Pradhan Mantri Jan Arogya Yojana (PM-JAY), is a government healthcare program in India launched by the Government of India in September...

पैन कार्ड के लिए ऑनलाइन आवेदन करने की पूरी जानकारी 2024

आयकर विभाग ने पैन कार्ड के ऑनलाइन आवेदन के लिए मुख्य रूप से प्रोटीन ईगॉव टेक्नोलॉजीज लिमिटेड (पूर्व में एनएसडीएल) को काम सौंपा है। इसके अलावा पैन कार्ड के आवेदन के लिए आईटी विभाग द्वारा यूटीआई...

How to Apply for Labour Card Online 2024

India, ranking second in global population, has approximately 500 million workers employed as laborers and on contractual basis across diverse sectors including agriculture, construction, and various industries. The Ministry of Labour and Employment, one of the...