नमस्कार मित्रांनो, आमच्या आजच्या या नवीन लेखात आपण सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. नेहमी प्रमाणे आज ही आम्ही तुमच्यासाठी काही तरी नवीन व खूप उपयोगी माहिती घेऊन आलो आहोत. मित्रांनो आजकाल प्रॉपर्टी च्या संदर्भात खूप फ्रॉड वाढत आहेत. मग अश्या वेळी आपण आपल्या प्रॉपर्टी वर लक्ष कस ठेवायचं? त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या? तसेच ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी वर कसे लक्ष ठेवू शकता, या बद्दल आज आपण सविस्तर पणे माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, जर तुमची प्रॉपर्टी म्हणजे जमीन, प्लॉट किंवा शेत जमीन असेल, किंवा घर असेल मग ती कुठेही, शहरात किंवा गावात असेल तर तुम्ही तुमच्या प्रॉपर्टी वर नेहमीच लक्ष ठेवायला पाहिजे. कारण आजकाल प्रॉपर्टी च्या संदर्भात खूप घोळ किंवा फ्रॉड होताना दिसतात. अनेक वेळा आपला भाऊ किंवा इतर नातेवाईक आपल्याला न सांगता आपली जमीन किंवा आपली प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करून घेतात, किंवा अमुक अमुक व्यक्तीने तुमच्या प्रॉपर्टी वर कब्जा केला, असे काही प्रकार बऱ्याच ठिकाणी घडत असतात.
या अश्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी काय करावे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आमचा आजचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. कारण या लेखात आम्ही तुम्हाला तुमच्या स्थायी प्रॉपर्टी वर ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच तुमच्या मोबाईल वरून लक्ष कस ठेवायचं या बद्दल माहिती सांगणार आहोत.
मित्रांनो, तुमच्या प्रॉपर्टी वर लक्ष कसे ठेवायचे हे जाणून घेण्याआधी तुमच्या प्रॉपर्टी चा सातबारा तुम्हाला आधी नीट समजून घ्यावा लागेल. व त्यावर दिलेल्या एक गोष्टीकडे तुमचं लक्ष असणे खूप गरजेचे आहे. ती कोणती गोष्ट आहे त्या बद्दल जाणून घेऊ या.
मित्रांनो, अनेक वेळा काही लीगल कामासाठी आपण आपल्या जमिनीचा किंवा प्रॉपर्टी चा सातबारा बघतो. या सातबारा वर सगळी नाव आधी होते तशीच असतात, पण त्यावर जर कुठे प्रलंबित फेरफार क्रमांक लिहिलेला दिसत असेल तर मात्र अश्या वेळी तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे.
प्रलंबित फेरफार म्हणजे काय
मित्रांनो, फेरफार म्हणजे सातबारा उताराच्या माहिती मध्ये बदल करणे. उदाहरण द्यायचे झाले तर, जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याची जमीन विकतो तेव्हा मालकाच्या नावामध्ये बदल करण्यासाठी फेरफार केला जातो.
मित्रांनो, जमिनीचा फेरफार जर तुमच्या संमतीने झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण अनेक वेळा भाऊ किंवा इतर नातेवाईक तुमच्या जमिनीवर कब्जा करून तुमच्या अपरोक्ष ती जमीन स्वतःच्या नावावर करून घेतात आणि तुम्हाला कळतही नाही. यासाठी तुमच्या सातबारावर कुठे लाल अक्षरात प्रलंबित फेरफार क्रमांक लिहिलेला आहे का ही गोष्ट तुम्ही दर पंधरा दिवसांनी चेक करायची आहे. जर तुमच्या सातबारावर कुठेही लाल अक्षरात प्रलंबित फेरफार क्रमांक दिसत असेल तर तुमच्या जमिनीवर काहीतरी व्यवहार चालू आहे असा त्याचा अर्थ होतो.
आणि जर हा व्यवहार तुम्हाला मान्य नसेल तर त्यावर हरकत घेण्यासाठी तुम्हाला पंधरा दिवसांनी मुदत दिली जाते व तशी नोटीसही जाहीर केली जाते. या पंधरा दिवसात तुम्ही तहसीलदार ला नोटीस देऊन हा व्यवहार थांबवू शकता. आणि जर ह्या पंधरा दिवसात तुम्ही काही आक्षेप घेतला नाही तर तलाठी फेरफार ची पुढील प्रक्रिया राबवितो. त्यामुळे तुमची जमीन किंवा प्रॉपर्टी कोणी बळकवत तर नाहीये ना, या गोष्टीकडे तुमचं लक्ष असणे खूप आवश्यक आहे. आणि यासाठी तुम्ही आपली चावडी या पोर्टल वर तुमच्या फेरफार विषयी माहिती व नोटीस बघू शकता.
फेरफारची माहिती व नोटीस कशी बघायची
आता फेरफारची माहिती व नोटीस कशी बघायची ते जाणून घेऊ या..
स्टेप 1 : मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi किंवा डायरेक्ट गुगल वरून आपली चावडी असे सर्च करून पहिलीच वेबसाईट ओपन करायची आहे.
स्टेप 2 : आपली चावडी पोर्टल ओपन झाल्यावर इथे तुम्हाला 7/12 विषयी या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका व नंतर तुमचं गाव निवडायचे आहे. आणि नंतर दिलेला कॅपचा कोड टाकून ते आपली चावडी पहा करायचे आहे.
स्टेप 3 : त्या नंतर या ठिकाणी तुम्ही निवडलेल्या ठिकाणच्या सर्व फेरफार बद्दलची माहिती तुम्हाला दिसेल. जसे की, तुम्हाला इथे फेरफार क्रमांक दिसेल, संबंधित मालमत्तेचा फेरफार प्रकार, (खरेदी, बोजा,हक्क सोड पत्र/ रिलीज डीड, वारस, इतर फेरफार), त्याचप्रमाणे फेरफार जेव्हा झाला तो दिनांक, आणि नंतर हरकत नोंदविण्याची शेवटची तारीख दिसेल, (फेरफार दिनांक झाल्यानंतर हरकत घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली जाते), तसेच येथे सर्वे नंबर किंवा गट क्रमांक ही दिसेल.
मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या सातबारा(7/12) विषयी झालेल्या फेरफार संबंधित अधिक माहिती बघायची असेल तर त्यासाठी तुम्ही सर्वात शेवटी असणाऱ्या ‘पहा’ या बटन वर क्लिक करायचे आहे.
स्टेप 4 : आणि मग तुम्हाला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 यांच्या कलम 150(2) अन्वये सूचना किंवा नोटीस या ठिकाणी स्पष्ट रूपात दिसते की जर तुम्हाला या व्यवहारावर काही हरकत घ्यायची असेल तर तुम्हाला 15 दिवसांची मुदत दिली जाते. या पंधरा दिवसात तुम्ही या नोटीस वर ऑब्जेक्शन घेऊन हा व्यवहार थांबवू शकता.
तर मित्रांनो, अश्या प्रकारे आज आपण घर बसल्या मोबाईल वरून आपल्या प्रॉपर्टी वर लक्ष कस ठेवायचं, या बद्दल माहिती जाणून घेतली. मी आशा करतो की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, व या लेखातील माहिती वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच तुम्हाला जर हा लेख महत्व पूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र व मैत्रिणीं सोबत नक्की शेअर करा.